Guru Shukra Yuti 2026 Dainik Gomantak
Horoscope

Guru Shukra Yuti 2026: दारिद्र्य संपणार, श्रीमंती येणार! 10 जूनपासून खुला होणार कुबेराचा खजिना; शुक्र-गुरुची युती 3 राशींना बनवणार मालामाल

Guru Shukra Yuti 2026: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जेव्हा दोन ग्रह एकाच अंशावर (0 डिग्री) एकत्र येतात, तेव्हा 'युति दृष्टी योग' निर्माण होतो.

Manish Jadhav

Shukra Guru Yuti 2026 Financial Benefits: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जेव्हा दोन ग्रह एकाच अंशावर (0 डिग्री) एकत्र येतात, तेव्हा 'युति दृष्टी योग' निर्माण होतो. असाच एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोग येत्या बुधवारी (10 जून) जुळून येत आहे. या दिवशी सुख, समृद्धी आणि प्रेमाचा कारक असलेला शुक्र ग्रह आणि ज्ञान, भाग्याचा कारक असलेला गुरु ग्रह दोन्ही कर्क राशीत अगदी 0 डिग्रीवर एकत्र येणार आहेत.

शुक्र आणि गुरुची ही युती काही राशींच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. विशेषतः 3 राशींच्या व्यक्तींना या काळात प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता असून, त्यांच्या प्रेमजीवनात आणि वैवाहिक आयुष्यात मोठे यश मिळणार आहे. चला तर मग या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आणि त्यांच्यावर काय प्रभाव पडणार आहे, याविषयी जाणून घेऊया...

सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि गुरुची ही युती अत्यंत फलदायी आणि शुभ ठरणार आहे. दोन्ही ग्रह एकाच राशीत 0 डिग्रीवर आल्यामुळे निर्माण होणारा हा योग तुमच्या प्रेमसंबंधांसाठी उत्तम काळ घेऊन येईल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्हाला जोडीदाराची खंबीर साथ मिळेल आणि प्रेमात यश येईल. या काळात नशिबाची पूर्ण साथ लाभल्यामुळे तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अडचणी आणि मानसिक तणाव पूर्णपणे संपुष्टात येईल. तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळण्याचे संकेत आहेत. तसेच वैवाहिक आयुष्यात लाइफ पार्टनरचे पूर्ण सहकार्य लाभल्याने घरातील वातावरण आनंदी राहील.

तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा युति दृष्टी योग आर्थिक प्रगतीची नवी दारे उघडून देणारा ठरेल. या शुभ योगाच्या प्रभावामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचे आगमन होईल. तुम्ही भूतकाळात केलेल्या कष्टांचे आणि कडक मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची हीच ती वेळ आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ ठरेल. अनपेक्षित आणि अचानक धनलाभ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमालीची मजबूत होईल, ज्यामुळे तुमचे मन अत्यंत प्रसन्न राहील.

मीन राशीच्या लोकांच्या जीवनात या शुभ योगामुळे मोठ्या प्रमाणावर सकारात्मकता येणार आहे. शुक्र आणि गुरुच्या प्रभावाने तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमधील कटुता संपून नातेसंबंधांमध्ये कमालीची मधुरता येईल. कोणत्याही कठीण प्रसंगात तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य लाभेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय (Business), व्यापार किंवा कोणतेही नवीन काम सुरु करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत सर्वोत्तम आणि यश देणारा ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT