Shiani Rashi Parivartan Dainik Gomantak
Horoscope

Shani Rashi Parivartan: 30 वर्षांनंतर होणार 'शनी' परिवर्तन! 'या' 3 राशींच्या नशिबाला लागणार ग्रहण; साडेसातीचा फेरा घेणार तुमच्या संयमाची परीक्षा

Shani Gochar 2027: ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्माचा दाता आणि न्यायाचा देवता मानले जाते. शनीची चाल अत्यंत मंद असल्याने त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो.

Manish Jadhav

Shani Gochar 2027: ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्माचा दाता आणि न्यायाचा देवता मानले जाते. शनीची चाल अत्यंत मंद असल्याने त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. सध्या शनिदेव मीन राशीमध्ये विराजमान असून त्यांच्या या गोचरमुळे कुंभ, मीन आणि मेष राशीच्या जातकांवर साडेसातीचा प्रभाव आहे, मात्र, ग्रहांची ही स्थिती कायमस्वरुपी नसून आगामी काळात मोठ्या बदलांचे संकेत मिळत आहेत. 2027 मध्ये होणारे शनीचे राशी परिवर्तन अनेक राशींचे नशीब पालटणारे ठरेल, तर काहींसाठी हा काळ अत्यंत कठीण परीक्षेचा असू शकतो.

द्रिक पंचांगानुसार, 3 जून 2027 रोजी शनिदेव मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करतील. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, तब्बल 30 वर्षांनंतर शनिदेव मेष राशीत जाणार आहेत. विशेष म्हणजे, मेष ही शनीची नीच राशी मानली जाते. जेव्हा शनि नीच राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा प्रभाव काही बाबतीत कमकुवत होतो, परंतु त्याचा स्वभाव अधिक कठोर आणि परिणाम आव्हानात्मक होतात. 3 जून 2027 रोजी होणाऱ्या या बदलामुळे काही राशींची साडेसाती आणि ढैय्या संपणार असली, तरी वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या जातकांसाठी मात्र अडीच वर्षांचा संघर्षमय काळ सुरु होणार आहे.

वृषभ राशीच्या लोकांसाठी 3 जून 2027 हा दिवस साडेसातीची सुरुवात घेऊन येईल. शनि मेष राशीत जाताच वृषभ राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. या काळात मानसिक तणाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अडथळे निर्माण होतील आणि तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्यास विलंब होईल.

आर्थिक आघाडीवर तुमचे पैसे अडकू शकतात आणि खर्चाचे प्रमाण उत्पन्नापेक्षा जास्त राहू शकते. कौटुंबिक जीवनात चुकीचे समज निर्माण झाल्यामुळे जवळच्या व्यक्तींपासून दुरावा निर्माण होऊ शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे या काळात महाग पडू शकते, विशेषतः निद्रानाश आणि मानसिक अस्वस्थतेचा त्रास जाणवेल. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी विचार करणे आणि प्रत्येकावर आंधळा विश्वास न ठेवणे या काळात हिताचे ठरेल.

कन्या राशीच्या जातकांसाठी 2027 पासून शनीची ढैय्या सुरू होईल. या काळात कार्यक्षेत्रात कामाचा दबाव प्रचंड वाढेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे मतभेद होऊ शकतात आणि पदोन्नतीमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक नियोजनात सावध राहावे लागेल, कारण उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. नात्यांमध्येही काहीसा थंडावा येईल आणि मित्र तुमची साथ सोडू शकतात. आरोग्याच्या (Health) बाबतीत पोट आणि नसांशी संबंधित जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. छोटीशी चूकही मोठ्या संकटात टाकू शकते, त्यामुळे सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.

मकर राशीवरही 2027 पासून शनीची ढैय्या सुरु होणार आहे. या जातकांसाठी कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे अचानक वाढेल, ज्यामुळे घरात तणावाचे वातावरण राहू शकते. मालमत्तेशी संबंधित वादात अडकण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये अस्थिरता जाणवेल आणि इच्छेविरुद्ध बदली किंवा स्थान बदलाचा दबाव येऊ शकतो. निर्णय घेताना संभ्रम निर्माण होईल आणि मन अशांत राहील. जुन्या मित्रांशी असलेले संबंध बिघडू शकतात आणि बचतीमध्ये घट झाल्याने आर्थिक चिंता सतावेल. वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आणि संयम राखणे या काळात अत्यंत गरजेचे आहे. एकंदरीत, शनीचे हे मेष राशीतील संक्रमण या तीन राशींसाठी शिस्त, धैर्य आणि आत्मनियंत्रणाची मोठी परीक्षा घेणारे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT