Rashi Bhavishya 27 October 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 27 October 2024: विवाहाचा विषय मार्गी लागेल,धनलाभ देखील होईल; आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

Daily Horoscope 27 October 2024: आजचा दिवस कामे मार्गी लागण्याचा

गोमन्तक डिजिटल टीम

आजचे पंचांग

(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे)

रविवार,२७ आक्टोबर २०२४,अश्विन कृष्ण पक्ष, शरद ऋतु,क्रोधी नाम संवत्सर,शके १९४६.

  • तिथि- एकादशी (अहोरात्र)

  • रास- सिंह

  • नक्षत्र- मघा १२l२४

  • योग - ब्रह्मा (अहोरात्र)

  • करण - बव -------

  • सूर्योदय - ०६:३८

  • चंद्रोदय - २७:०७

  • दिनविशेष - वृध्दीतिथी

आजचे राशीभविष्य

मेष - विवाहाचा विषय मार्गी लागेल, प्रेमकरणात यश मिळेल, स्नेही लोकं भेटतील, आवडीच्या लोकांकडून विशेष लाभ होईल, भागीदारीत चांगला नफा होईल.

वृषभ - एकटेपणा जाणवेल, अध्यात्मिक अभ्यास होईल. स्थावर मालमत्तेच्या विषयी विचार होईल.

मिथून - प्रवासी उद्योगात चांगले यश मिळेल, बदली होऊ शकते परंतु काळजी नसावी बदली देखील लाभदायक असेल.

कर्क - सध्या आपल्या राशीत मंगळ अशुभ असून दशमात स्थित आहे, नोकरीच्या ठिकाणी चिडचीड सारख्या घटना घडू शकतात, डोके शांत ठेऊन निर्णय घ्या.

सिंह - अधिकाराचा छान फायदा करून घ्याल, लाभदायक घटना घडतील तसेच मित्रमंडळी भेटतील, आरोग्य प्रतिकार शक्ति उत्तम असेल,अस्वस्थता दूर होईल.

कन्या - कष्ट होतील,आरोग्याची प्रतिकार शक्ति थोडी कमी होईल यामुळे आळस निर्माण होईल, सध्या विश्रांतीची आवश्यकता आहे.

तूळ - कामाच्या गडबडीत कुटुंबाकडे लक्ष कमी असेल, त्यामुळे भावंड इत्यादी नाराज होऊ शकतात, काही विषय आपण समजावे व समजून घ्यावे जेणेकरुन कुटुंबातील वातावरण बिघडणार नाही.

वृश्चिक - कुटूंबातील लोकांकडे विशेष लक्ष द्याल, त्यांच्यासाठी खरेदी होईल, धनलाभ देखील छान होईल, आवश्यक ठिकाणी खर्च निश्चित करावा, वरिष्ठांना नाराज करू नये.

धनु - जवळचे प्रवास होतील, प्रेमात यश मिळेल,संतती सुख लाभेल, अभ्यासात विशेष प्रगती कराल, नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळतील.

मकर - थकवा जाणवेल, जबाबदाऱ्यांचे ओझे जाणवायला लागेल, आळस वाढू देऊ नका,आरोग्य सांभाळावे,नित्य व्यायाम तथा ध्यान धरणेने मन स्वस्थ राहील अस्वस्थ होणार नाही.

कुंभ - मुलाबाळांकडे विशेष लक्ष द्या,काही अशा घटना घडतील ज्याला केवळ तुम्ही कारणीभूत ठराल

मीन - अपघाती क्षेत्रात वाहने सावकाश चालवा,आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, अजून काही काळ त्रास जाणवेल,लवकरच लाभाची प्राप्ती होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT