Rashi Bhavishya 19 October 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 19 October 2024: गुंतवणूकदारांसाठी चांगला दिवस, मिळेल तगडा फायदा; जाणून घ्या काय सांगतयं आजचं राशीभविष्य

गोमन्तक डिजिटल टीम

आजचे पंचांग

  • शनिवार,19 आक्टोबर 2024, अश्विन कृष्ण पक्ष

  • शरद ऋतु, क्रोधी नाम संवत्सर,शके 1946.

  • तिथि- द्वितीया 09l49

  • रास- मेष

  • नक्षत्र- भरणी 10l47

  • योग - सिद्धि 17l41

  • करण - विष्टि 06l47

  • दिनविशेष - 11 पर्यंत चां. दिवस

आजचे राशीभविष्य

(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे)

मेष- घरासंदर्भातील कामे होतील, मातृसुख लाभेल, घरात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील, प्रसन्नता वाटेल, वाहनसुख, गृहसुख इत्यादी मिळेल.

वृषभ- शिक्षणात विशेष लाभ, संततीकडून आनंद प्राप्त होईल, ईश्वरभक्ती, उपासना, आराधना इत्यादी वाढेल, नवीन अभ्यास करण्यास इच्छा होईल. गुंतवणुकीत फायदा.

मिथुन- आरोग्य सांभाळावे तक्रारी येऊ शकतात, द्विधा मनस्थिती होऊन निर्णय घेण्यास अडचण येऊ शकते. प्रवास नियमित करावा, भावंडांशी संपर्क होईल.

कर्क- जोडीदारासोबत घरातील कामांसाठी हजेरी लावाल, मातृसुख मिळेल, भागीदारीत विशेष लक्ष असावे. गृहसौख्यासाठी कष्ट करावे लागेल. परिश्रमाचे फळ मिळेल.

सिंह- शेअर मार्केटमध्ये फायदा होऊ शकतो. एकटेपणा जाणवेल. आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करु नये अन्यथा अधिकार गमावून बसू शकता. योग्य ठिकाणी आपल्या ऊर्जेचा उपयोग केल्यास योग्य मोबदला मिळेल.

कन्या- प्रतिकार शक्ती कमी होईल. थकवा जाणवेल. प्रवास कष्टदायक वाटेल, परंतु तरीही प्रवासातील कामे आपण कराल, अध्यात्मिक शक्ती वाढवावी, इष्ट देवतेची आराधना करावी, ज्यामुळे प्रतिकार शक्ती वाढेल.

तूळ- नोकरी/व्यवसाय संदर्भात अडचणी निर्माण होण्याची संभावना दिसते. याविषयावरुन जोडीदारासह वादविवाद होऊ शकतो. घरचा विषय कामाच्या ठिकाणी व कामाचा विषय घरी नाही काढला तर कदाचित शांतता राहील.

वृश्चिक- लाभदायक काळ असेल. विशेष खरेदी कराल, वाहन सुख लाभेल. मित्रांची तथा स्नेही व्यक्तींची भेट होऊ शकते. व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो.

धनु- शक्यतो दूरचा प्रवास टाळावा. अभ्यासाकडे लक्ष द्यावे अन्यथा मिळालेली संधी वाया जावू शकते. बुध्दीचा योग्य उपयोग करुन अध्यात्मात प्रगती करुन घ्यावी. निश्चित ईश्वर कृपा होईल.

मकर- कामे जलद गतीने होणार नाहीत, परंतु नियमित मात्र होतील. व्यवसायात विशेष लाभ होईल. नियतीने कार्ये कराल तर उत्तम फळ मिळेल.

कुंभ- कष्टांचे फळ थोडे विलंबाने मिळेल. जिथे धैर्य असेल तिथे नक्कीच छान फळ मिळेल, त्यामुळे सर्व कार्ये धैर्याने करावीत. देवावर विश्वास ठेवा तुमच्या वाटेचे फळ तुम्हालाच मिळणार.

मीन- या राशीत बारावा चंद्र असून राहू स्थित आहे, ज्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. अर्थात काहीशा ठिकाणी द्विधा मनस्थिती होऊ शकते, अशा वेळी आपल्या आवडत्या व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यावे त्यातून मार्ग मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरु होण्याची शक्यता; काय असेल मुख्यमंत्र्यांचा निर्णय?

IFFI 2024: 'इफ्फी'साठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरु! अंतिम मुदत 12 नोव्हेंबर

Malim News: गोवेकरांनाच मिळतात 'मासे' महाग? निर्यात मासळीमुळे सावळागोंधळ; 'मत्स्य' खात्याने लक्ष देण्याची गरज

Calangute Crime: कळंगुटमध्ये रात्रंदिवस पोलिसांचा जागता पहारा; बिघडलेली कायदा-सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न!

Goa Todays Live Update: 'TRADITIONAL TREES OF BHARAT' पुस्तकाचे गोव्याच्या राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन!

SCROLL FOR NEXT