IFFI 2024: 'इफ्फी'साठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरु! अंतिम मुदत 12 नोव्हेंबर

Goa Iffi 2024: इफ्फीमध्ये अनुभवी चित्रपट समीक्षक किंवा गोष्ट सांगण्याची आवड असलेल्या नवोदित पत्रकारांना २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अनुभूती घेता येणार आहे. या महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधी म्हणून नावनोंदणी केल्यानंतर दर्जेदार चित्रपटांवरील आशयघन लेखांसह हा महोत्सव जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या चमूचा ते भाग बनू शकणार आहेत.

Goa IFFI 2024 Registration Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa IFFI 2024 Registration For Media Representative

पणजी: ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २०२४ साठी माध्यम प्रतिनिधींच्या नोंदणीला आजपासून (१८ रोजी) रोजी सुरुवात झाली आहे.

या इफ्फीमध्ये अनुभवी चित्रपट समीक्षक किंवा गोष्ट सांगण्याची आवड असलेल्या नवोदित पत्रकारांना २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अनुभूती घेता येणार आहे. या महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधी म्हणून नावनोंदणी केल्यानंतर दर्जेदार चित्रपटांवरील आशयघन लेखांसह हा महोत्सव जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या चमूचा ते भाग बनू शकणार आहेत.

माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठी १ जानेवारीपर्यंत वयाची २१ वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे आणि मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल किंवा ऑनलाइन माध्यम संस्थेशी संबंधित वार्ताहर, छायाचित्रकार, कॅमेरा पर्सन किंवा डिजिटल सर्जक असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा अट पूर्ण करणाऱ्या मुक्त पत्रकारांनादेखील नोंदणी करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. कृपया नोंदणी करण्यापूर्वी संबंधित पात्रता निकष वाचून नमूद कागदपत्रे नोंदणी करण्यापूर्वी अपलोड करण्यासाठी तुम्ही तयार ठेवा. नोंदणी प्रक्रिया सुलभ असून https://my.iffigoa.org/media-login यावर ती ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकते.

Goa Iffi 2024: इफ्फीमध्ये अनुभवी चित्रपट समीक्षक किंवा गोष्ट सांगण्याची आवड असलेल्या नवोदित पत्रकारांना २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अनुभूती घेता येणार आहे. या महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधी म्हणून नावनोंदणी केल्यानंतर दर्जेदार चित्रपटांवरील आशयघन लेखांसह हा महोत्सव जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या चमूचा ते भाग बनू शकणार आहेत.
Lotulim Crime: गोव्यात धावत्या बसमध्ये युवतीचा विनयभंग! संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद

नोंदणीसाठी अंतिम मुदत १२ नोव्हेंबर

नोंदणीची अंतिम मुदत १२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत आहे. माध्यम क्षेत्रातील ज्या व्यक्तींना सदर नोंदणी प्रक्रियेच्या माध्यमातून पत्रसूचना कार्यालयाद्वारे (पीआयबी) मान्यता देण्यात आली असेल अशाच व्यक्ती इफ्फीसाठीचे माध्यम प्रतिनिधी म्हणून पास मिळविण्यास पात्र ठरतील. कोणत्याही माध्यम संस्थेची नियतकालिकता, आवाका (अभिसरण, प्रेक्षकवर्ग, पोहोच), चित्रपटांवरील भर आणि इफ्फीसंदर्भातील अपेक्षित मीडिया कव्हरेज इत्यादी घटकांच्या आधारावर पीआयबी प्रत्येक माध्यम संस्थेला किती मान्यतापत्रे द्यायची याचा निर्णय घेईल. मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधींना १८ नोव्हेंबरपासून इफ्फीच्या कार्यस्थळावर त्यांचे माध्यम प्रतिनिधी पासेस मिळतील. या संदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी ‘माध्यम मान्यतेबाबत चौकशी’ अशा विषयाच्या उल्लेखासह pibiffi[at]gmail[dot]com या ईमेल आयडीवर मेल पाठवावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com