Budh Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Budh Gochar 2026: बुध गोचराचा धमाका! 'या' भाग्यवान राशींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस; मालामाल करणारी डील होणार फायनल

Budh Gochar 2026 Lucky Zodiac Signs: बुद्धी, वाणी आणि व्यापाराचा कारक मानला जाणारा बुध ग्रह जेव्हा जेव्हा नक्षत्र बदलतो, तेव्हा सर्व राशींच्या आर्थिक आणि व्यावसायिक जीवनावर त्याचा थेट प्रभाव पडतो.

Manish Jadhav

Budh Gochar 2026 Lucky Zodiac Signs: बुद्धी, वाणी आणि व्यापाराचा कारक मानला जाणारा बुध ग्रह जेव्हा जेव्हा नक्षत्र बदलतो, तेव्हा सर्व राशींच्या आर्थिक आणि व्यावसायिक जीवनावर त्याचा थेट प्रभाव पडतो. आज (8 ऑगस्ट) बुध ग्रहाने अत्यंत महत्त्वाचे नक्षत्र परिवर्तन केले. बुध ग्रह आज सकाळी ठीक 7 वाजून 23 मिनिटांनी पुष्य नक्षत्रात प्रवेशकर्ता झाला. ज्योतिषशास्त्रामध्ये पुष्य नक्षत्राला 'नक्षत्रांचा राजा' मानले जाते, त्यामुळे बुधाचे हे मार्गक्रमण अत्यंत शुभ आणि प्रचंड लाभदायक ठरणार आहे.

बुध ग्रह आगामी 16 ऑगस्टपर्यंत याच नक्षत्रात विराजमान राहणार असून, त्यानंतर तो अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. यामुळे 16 ऑगस्टपर्यंतचा हा काळ चार भाग्यवान राशींसाठी अतिशय सुवर्णकाळ ठरणार असून त्यांच्यावर बुध देवाच्या कृपेने बंपर लाभांचा वर्षाव होणार आहे.

या गोचराचा सर्वात मोठा फायदा मिथुन राशीच्या जातकांना होणार आहे. मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती या काळात कमालीची सुधारेल आणि उत्पन्नाचे स्रोत वाढतील. तुमच्या वाणीमध्ये एक प्रकारची गोडवा आणि संवादात्मक चमक निर्माण होईल, ज्याच्या जोरावर तुम्ही कार्यक्षेत्रात मोठे लाभ मिळवाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ प्रगतीचा असून, तुमचे अनेक दिवसांपासून अडकलेले किंवा बुडालेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. व्यापाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन आला असून, एखादी मोठी व्यावसायिक डील फायनल झाल्यामुळे तुम्हाला प्रचंड मोठा नफा कमावता येईल.

सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचे पुष्य नक्षत्रातील हे भ्रमण वरदान ठरेल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या मान-सन्मानात तसेच प्रतिष्ठेत मोठी वाढ होईल. आर्थिक आघाडीवर हा काळ तुम्हाला सुबत्ता देणारा ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात पदोन्नती (Promotion) मिळण्याची किंवा पगारवाढ होण्याची आनंदाची बातमी मिळू शकते. कार्यस्थळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल आणि कुटुंबातील सदस्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे तुम्ही यशाची शिखरे गाठाल.

कन्या आणि धनु राशीच्या जातकांसाठीही हा काळ तितकाच भाग्याचा राहील. कन्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाल्याने त्यांच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असून, अचानक झालेल्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळू शकतो. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना या काळात हवी ती नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी लाभेल. धनु राशीच्या लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील आणि आर्थिक यश तुमच्या दारी येईल. या काळात बुध ग्रहाची स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी आणि भगवान गणेशाची कृपा मिळवण्यासाठी या राशींनी गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण करावेत, तसेच 'ॐ बुं बुधाय नमः' या मंत्राचा जप करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT