Krishna Janmashtami 2025 Dainik Gomantak
Horoscope

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

Krishna Janmashtami Horoscope 2025: कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दुर्मिळ योगायोग झाल्यामुळे, राज्यावर देश आणि जगावर तसेच सर्व १२ राशींच्या लोकांवर शुभ आणि अशुभ परिणाम होतील.

Sameer Amunekar

Krishna Janmashtami Horoscope 2025

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दुर्मिळ योगायोग झाल्यामुळे, राज्यावर देश आणि जगावर तसेच सर्व १२ राशींच्या लोकांवर शुभ आणि अशुभ परिणाम होतील. चला तर मग जाणून घेऊया कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या राशी भाग्यवान ठरू शकतात.

अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, ज्योतिषशास्त्रानुसार १६ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल. या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामध्ये सर्वार्थ सिद्धि योग, वृद्धि योग आणि अमृत सिद्धि योग यांचा महासंयोग समाविष्ट आहे. त्याचा प्रभाव तीन राशीच्या लोकांवर अधिक दिसून येईल.

अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दुर्मिळ योगायोगामुळे, वृषभ, कर्क आणि सिंह राशीच्या लोकांना भगवान श्रीकृष्णाचे विशेष आशीर्वाद मिळतील. या राशीच्या लोकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल.

वृषभ राशीच्या लोकांना भगवान श्रीकृष्णाचे विशेष आशीर्वाद मिळतील. व्यवसायात नफा होईल, अडकलेले पैसे परत मिळतील आणि नोकरीत वाढ होईल. भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनही गोड होईल.

सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळू शकते. धार्मिक कार्यात रस वाढेल आणि प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील.

भगवान श्रीकृष्णाच्या विशेष आशीर्वादामुळे जन्माष्टमीच्या दिवशी कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभ मिळेल. गुंतवणुकीचे चांगले परिणाम मिळतील आणि आर्थिक स्थिती मजबूत राहील. अनेक मार्गांनी पैशाच्या आवकचा मार्ग मोकळा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT