Weekly Finance Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Weekly Horoscope: धन, यश आणि मान-सन्मान देणारा आठवडा! 'या' राशींवर लक्ष्मीची विशेष कृपा; वाचा संपूर्ण माहिती

19 to 25 January horoscope: १९ ते २५ जानेवारीदरम्यान मकर राशीत मंगळ, सूर्य, बुध आणि शुक्र एकत्र विराजमान राहणार असून त्यामुळे शुक्रादित्य, बुधादित्य, लक्ष्मी-नारायण आणि चतुर्ग्रही राजयोग निर्माण होत आहे.

Sameer Panditrao

जानेवारी महिन्याचा हा आठवडा अनेक राशींच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. १९ ते २५ जानेवारीदरम्यान मकर राशीत मंगळ, सूर्य, बुध आणि शुक्र एकत्र विराजमान राहणार असून त्यामुळे शुक्रादित्य, बुधादित्य, लक्ष्मी-नारायण आणि चतुर्ग्रही राजयोग निर्माण होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच चंद्र मकर राशीत प्रवेश करून पंचग्रही राजयोग घडवणार आहे.

याशिवाय सिंह राशीत केतू, कुंभ राशीत राहू आणि मीन राशीत शनी विराजमान आहेत. या ग्रहस्थितीमुळे अनेक राशींच्या जातकांना रखडलेली कामे पूर्ण होणे, आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळत आहेत. हे भाकीत चंद्र राशीवर आधारित आहे.

मेष (Aries)

हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरेल. आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल. नोकरीत नवीन संधी, पदोन्नती किंवा उत्पन्नवाढीचे योग आहेत. सर्जनशील कल्पनांना चांगली दाद मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा लाभेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. मात्र शनीच्या प्रभावामुळे अचानक बदल संभवतात.

वृषभ (Taurus)

भाग्याची साथ मिळणारा आठवडा. परदेशाशी संबंधित व्यवसाय, नोकरी किंवा प्रवासात लाभ संभवतो. प्रेमसंबंध आणि आरोग्य समाधानकारक राहील. उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. एकूणच आनंददायी काळ.

मिथुन (Gemini)

आकस्मिक धनलाभ, नोकरीत प्रगती आणि कायदेशीर अडचणींमधून सुटका होण्याचे संकेत आहेत. खर्चांवर नियंत्रण मिळेल. प्रवासातून फायदा होईल. व्यवसायातही चांगले यश मिळू शकते.

कर्क (Cancer)

आठवड्याच्या सुरुवातीला मानसिक तणाव जाणवू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. मात्र आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती सुधारेल. शेअर बाजार, गुंतवणूक किंवा कायदेशीर प्रकरणांत लाभ संभवतो. अध्यात्माकडे ओढ वाढेल.

सिंह (Leo)

हा आठवडा आव्हानात्मक ठरू शकतो. कामाचा ताण आणि आरोग्यविषयक त्रास संभवतो. मात्र परदेशी व्यवहार, व्हिसा किंवा व्यापाराशी संबंधित बाबींमध्ये यश मिळू शकते. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी आवश्यक.

कन्या (Virgo)

आर्थिक स्थिती मजबूत राहील. शेअर बाजारातून लाभ संभवतो. नोकरीत स्थैर्य, कुटुंबासोबत आनंदाचे क्षण मिळतील. मानसिक तणावातून काहीसा दिलासा मिळेल.

तूळ (Libra)

आर्थिकदृष्ट्या उत्कृष्ट आठवडा. शेअर्स, रिअल इस्टेट किंवा भागीदारी व्यवसायातून नफा होऊ शकतो. संशोधन, शिक्षण, समुपदेशन क्षेत्रातील लोकांना विशेष यश.

वृश्चिक (Scorpio)

हा आठवडा तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. आत्मविश्वास वाढेल. संवादकौशल्याच्या जोरावर मोठी डील किंवा प्रकल्प मिळण्याची शक्यता. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा.

धनु (Sagittarius)

भाग्याची साथ लाभणारा काळ. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. शेअर बाजारातून फायदा होईल. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मकर (Capricorn)

आठवड्याची सुरुवात थोडी तणावपूर्ण असली तरी शेवट सुखद ठरेल. ई-कॉमर्स, नव्या करारांमधून आर्थिक लाभ होईल. आत्मविश्वासात वाढ होईल.

कुंभ (Aquarius)

आनंददायी आठवडा. परदेशी व्यवसायात लाभ. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य काळ. मात्र आठवड्याच्या मध्यात गुंतवणूक टाळावी.

मीन (Pisces)

आर्थिक व कौटुंबिक बाबतीत आव्हाने संभवतात. वाद टाळावेत. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सतर्कता आवश्यक.

✦ डिस्क्लेमर

वरील राशिभविष्य विविध ज्योतिषीय स्रोत, पंचांग व मान्यतांवर आधारित आहे. याचा उद्देश केवळ माहिती देणे हा असून, कोणत्याही प्रकारच्या निर्णयासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT