Horoscope Today, March 03, 2026 Chandra Grahan Dainik Gomantak
Horoscope

Horoscope Today, Chandra Grahan: वर्षातील पहिलं चंद्रग्रहण! 'या' 3 राशींचे नशीब फळफळणार; बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ!

Horoscope Today, March 03, 2026 Chandra Grahan 3 March 2026: आज फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असून मंगळवारच्या शुभ मुहूर्तावर खंडग्रास चंद्रग्रहण लागत आहे.

Sameer Amunekar

Lucky zodiac signs during eclipse : आज फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असून मंगळवारच्या शुभ मुहूर्तावर खंडग्रास चंद्रग्रहण लागत आहे. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून ही महत्त्वाची घटना असली तरी, ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहणाचा सर्व १२ राशींवर खोलवर परिणाम होणार आहे. या ग्रहणाच्या काळात काही राशींचे नशीब पालटणार असून त्यांना अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत, तर काहींना सावध राहण्याची आवश्यकता आहे.

ग्रहांच्या हालचाली आणि राशीभविष्य

आजच्या दिवशी मेष राशीच्या लोकांसाठी यशाचे दरवाजे उघडणार आहेत. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले परीक्षेचे निकाल सकारात्मक लागतील. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास मेष राशीच्या व्यक्तींना धार्मिक प्रवासाची संधी मिळेल. दुसरीकडे, वृषभ राशीच्या व्यक्तींनी आपल्या व्यक्तिगत गोष्टी गुप्त ठेवणे हिताचे ठरेल. जरी खर्च वाढले तरी उत्पन्नाचे स्रोतही वाढणार असल्याने आर्थिक चणचण भासणार नाही.

व्यापार आणि करिअरमधील बदल

कर्क आणि सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुवर्णसंधी घेऊन आला आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला व्यवसायात फायदेशीर ठरेल, तर सिंह राशीच्या व्यक्तींना मालमत्तेच्या व्यवहारातून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न मार्गी लावणारा ठरेल.

सावधानता आणि उपाय

मिथुन आणि धनु राशीच्या व्यक्तींनी आज अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे टाळावे. विशेषतः व्यवहाराच्या बाबतीत घाईत घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संशोधनाच्या क्षेत्रात नवीन यश मिळवून देणारा आहे, परंतु त्यांनी अध्यात्माकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी परदेश गमनाचे मार्ग मोकळे होऊ शकतात. नोकरीत बढतीची शक्यता असल्याने मनावरचा ताण हलका होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT