Grahan Yog in astrology Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: 10 ऑगस्टपासून 'ग्रहण योग' सुरू; 'या' तीन राशींच्या अडचणी वाढणार

August 10 astrology prediction: एक महत्त्वाचा आणि अशुभ योग म्हणजे 'ग्रहण योग', जो चंद्र आणि छायाग्रह राहु किंवा केतु यांच्या संयोगातून तयार होतो.

Akshata Chhatre

Grahan Yog horoscope: ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांच्या बदलांना मोठे महत्त्व दिले जाते. काही ग्रहयोग शुभ आणि कल्याणकारी असतात, तर काही योग आपल्या अशुभ प्रभावासाठी ओळखले जातात. असाच एक महत्त्वाचा आणि अशुभ योग म्हणजे 'ग्रहण योग', जो चंद्र आणि छायाग्रह राहु किंवा केतु यांच्या संयोगातून तयार होतो.

१० ऑगस्टपासून 'ग्रहण योगा'ची निर्मिती

१० ऑगस्ट २०२५ रोजी मन आणि भावनांचा कारक ग्रह चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीपासूनच राहु ग्रह विराजमान आहे. यामुळे कुंभ राशीत 'ग्रहण योग' तयार होईल, ज्यामुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात तणाव आणि आव्हाने वाढू शकतात.

'ग्रहण योगा'चा या राशींवर अशुभ प्रभाव

सिंह (Leo): ग्रहण योगामुळे सिंह राशीच्या व्यक्तींच्या अडचणी वाढू शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा व्यावसायिक भागीदारासोबत मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात चढ-उतार अनुभवास येऊ शकतात. जोखीम असलेल्या कोणत्याही कामात किंवा गुंतवणुकीमध्ये पैसे लावू नका. नवीन संबंध सुरू करण्यापूर्वी काळजी घ्या.

तुळ (Libra): तुळ राशीच्या व्यक्तींना आर्थिक आघाडीवर मंदीचा सामना करावा लागू शकतो. अपेक्षित धनलाभ न झाल्यामुळे नवीन वाहन खरेदीची योजना पुढे ढकलू शकता. शारीरिक थकवा आणि डोळ्यांशी संबंधित समस्या आरोग्यासाठी चिंता वाढवतील. अनावश्यक खर्च आणि प्रवासातून मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदारासोबतच्या संबंधातही वाद होण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces): मीन राशीच्या व्यक्तींनी कामात शॉर्टकट घेण्यापासून दूर राहावे, अन्यथा अडचणी निर्माण होतील. कोणतीही योजना पूर्ण झाल्याशिवाय इतरांना सांगू नका. कामात कमतरता काढल्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. कुटुंबातील जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ताणामुळे शारीरिक वेदना जाणवतील आणि मेहनत करूनही अपेक्षित यश मिळण्यास विलंब होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात छापा! 8 मोबाईलसह तंबाखू हस्तगत; तुरुंगातील रामभरोसे कारभार उघड

Advalpal: ‘तुम्‍ही करोडो कमावता, आम्‍हाला का नागवता?’ अडवलपालमधील जमीनमालकाचा खाण कंपनीला संतप्‍त सवाल

Goa Coconut Price: बाप्पांचे विसर्जन झाले, तरी नारळ अजून भडकलेलेच; चिबूड, तवशांचीही आवक वाढली

Rashi Bhavishya 07 September 2025: नोकरीत संयमाने काम केल्यास चांगले यश , आज मेहनतीपेक्षा हुशारी जास्त उपयोगी ठरेल

SCROLL FOR NEXT