Holi 2026 Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Holi 2026 Horoscope: होळीला ग्रहांचं महामिलन! शुक्र-शनीची युती देणार छप्परफाड धनलाभ, रखडलेली कामं होणार पूर्ण; वैवाहिक जीवनातही नांदणार सुख

Shani Shukra Yuti in Meen Rashi 2026: यंदाचा होळीचा सण आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Manish Jadhav

Holi 2026 Horoscope: यंदाचा होळीचा सण आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. येत्या 3 मार्च रोजी होलिका दहन केले जाणार असून याच दिवशी चंद्रग्रहणही लागणार असल्याने या सणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यानंतर 4 मार्च रोजी रंगांची होळी अर्थात धुलिवंदन साजरे केले जाईल.

ज्योतिषशास्त्रीय गणितांनुसार, या वर्षी होळीच्या मुहूर्तावर ग्रहांची एक दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे. सुख आणि वैभवाचा कारक असलेला शुक्र ग्रह आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे मीन राशीत आधीच कर्मदाता शनिदेव विराजमान आहेत. यामुळे मीन राशीमध्ये शुक्र आणि शनीची युती होणार असून हा संयोग अनेक राशींच्या आयुष्यात आनंदाची उधळण करणारा ठरेल. या ग्रहांच्या महामिलनामुळे अनेक जातकांना आर्थिक लाभ, रखडलेली कामे मार्गी लागणे आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होण्याच्या संधी मिळणार आहेत.

या विशेष योगाचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव मेष राशीच्या जातकांवर दिसून येईल. होळीच्या या शुभ मुहूर्तावर मेष राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभाचे योग आहेत. जे लोक व्यापाराशी निगडित आहेत, त्यांच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. आर्थिक स्थिती भक्कम झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. करिअरच्या (Career) बाबतीत बोलायचे झाले तर प्रदीर्घ काळ रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होतील. जे नोकरीत आहेत, त्यांना बढती किंवा पगारवाढीची आनंदवार्ता मिळू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल, ज्यामुळे तुम्ही कठीण निर्णय सहज घेऊ शकाल.

सिंह राशीच्या लोकांसाठी ही होळी नशिबाची साथ घेऊन येणारी ठरेल. तुमच्या आयुष्यात गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या समस्या आता संपुष्टात येतील. प्रत्येक कामात तुम्हाला भाग्याची भक्कम साथ मिळेल, ज्यामुळे यशाचा मार्ग सुकर होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णसंधी मानला जात आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असून धनप्राप्तीचे नवे स्रोत निर्माण होतील. तसेच कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल आणि नात्यांमधील दुरावा कमी होईल.

धनु राशीच्या जातकांसाठी देखील हा काळ प्रगती आणि उन्नतीचा ठरणार आहे. होळीच्या काळात तुम्हाला काही नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात, ज्या भविष्यात तुमच्या फायद्याच्या ठरतील. व्यापारात नफा वाढण्यासोबतच उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक ओढताण संपेल. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी उत्तम असून त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. एकूणच, शुक्र-शनीची ही युती या तीन राशींच्या आयुष्यात रंगांसोबतच समृद्धीची उधळण करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणात ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

सॅम्युअल मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिस अधीक्षकांनी नोंदवले ब्रागांझा कुटुंबीयांचे जबाव, पोलिसांच्या कारवाईवर आमदार फेरेरांचे आक्षेप

Mala Lake Fish Death: मळा तलावातील माशांचा रहस्यमय मृत्यू! उच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर 32 घरांना बसला सांडपाणी जोडणीचा वेढा

SCROLL FOR NEXT