Rashi Bhavishya 3 October 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 3 October 2024: मेष राशीची शेअर मार्केटमध्ये होणार चांदी; असा असणार इतर राशींचा आजचा दिवस!

Daily Horoscope 3 October 2024: आजचा दिवस कोणासाठी ठरेल खास?

गोमन्तक डिजिटल टीम

(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे )

आजचे पंचांग

  • गुरुवार, 3 आक्टोबर २०२४, अश्विन शुक्ल पक्ष.

  • तिथि- प्रतिपदा २६l५९ पर्यंत.

  • रास- तुळ २९|०६ नंतर

  • नक्षत्र- हस्त १५l३२

  • योग - ऐंद्र २८l२४

  • करण - कींस्तुघ्न २९l२१

  • दिनविशेष - उत्तम दिवस.

मेष

आज विश्रांतीचा काळ असून देखील आज आपण कामे कराल,जलद कामे होतील, शेअर मार्केटमध्ये लाभ दिसतो. लाभदायक प्रवास होईल, मित्र-मैत्रिणी भेटतील,वाहने सावकाश चालवा. स्त्रियांनी आरोग्य सांभाळावे.

वृषभ

उत्तम प्रतिकार शक्ति जाणवेल, अध्यात्मिक ऊर्जा जाणवेल, आपल्या इष्टदैवतेच्या दर्शनास जावे, सुखकर प्रवास होईल, काहीतरी देवकार्य करण्याची इच्छा जागृत होईल असे दिसते,आजचा दिवस बरा असेल.

मिथून

पत्नीसह प्रवास होण्याचा योग, चिडचिड होण्याची शक्यता. मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. ध्यान-धारणा केल्याने मानसिक स्वास्थ्य लाभेल.

कर्क

मित्रमंडळींकडून विशेष मदत तथा लाभ होण्याची संभावना दिसते, काही ठिकाणी एकटेपणा जाणवेल परंतु काहीतरी करमणूक करत रहा ज्यामुळे मन अस्वस्थ होणार नाही.आज व्यवसायात चांगला नफा होईल.


सिंह

नैसर्गिक आरोग्य बिघडण्याची शक्यता दिसते,प्रवास टाळावा, शेअरमार्केट मधे गुंतवणूक करू नये नुकसान होण्याची शक्यता आहे,आज अगदी साधे जेवण जेवावे,झोप अधिक लागू शकते तरीही विश्रांती घेतल्यास उत्तम.

कन्या

कामाच्या ठिकाणी कष्ट होतील परंतु तुमच्यासाठी काही अवघड नसेल, थोडा तणाव जाणवेल परंतु सूर्यास्तानंतर उत्तम प्रसन्नता लाभेल,आरोग्याची काळजी घ्यावी, आज बाहेरील पदार्थ सेवन करणे टाळावे.

तूळ

पैसे योग्य ठिकाणी खर्च होतील,छान खरेदी होईल, आवडत्या लोकांची भेट होईल, पैसे गुंतवण्यास हरकत नाही उत्तम लाभ होऊ शकतो, व्यवसायात देखील चांगला फायदा होईल, कुटुंबातील लोकांमधे आनंद दिसेल.

वृश्चिक

दवाखाना होण्याची शक्यता,खर्च होईल,अनपेक्षित खर्च करू नका, जवळचे प्रवास होतील, बंधू भगिनी व शेजारी यांच्याशी आज जरा कमीच संवाद साधा, भांडणे किंवा वादविवाद होण्याची संभावना दिसते त्यामुळे शक्यतो मौनच धारण करा.

धनु

आज आरोग्यसंदर्भात प्रसन्नता जाणवेल,घरामधे सुखद घटना घडतील,चांगले कार्य होतील,कार्याची गती जरी कमी असली तरी आपले कार्य वेळेवर होईल हा विश्वास असावा.ज्यामुळे मानसिक स्वास्थ सदैव उत्तम असेल.

मकर

उद्योग, व्यवसायात चांगला नफा होईल, कुटुंबातील लोकांसाठी खर्च कराल, स्नेही लोकांची भेट होईल,पैसे गुंतवले असता लाभ मिळेल,संतती किंवा शिक्षणसंदर्भात चांगल्या बातम्या मिळतील.

कुंभ

सुखकर प्रवास घडतील, नैसर्गिक अनारोग्य येऊ शकते, हॉस्पिटल खर्च होण्याची संभावना.शत्रूंपासून सावधान राहावे, राजकारण संदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये, शेजाऱ्यांकडून लाभ होईल.

मीन

घरासाठी विचार करत असाल तर आज उत्तम ठिकाण मिळेल, पाण्यापासून सावध राहावे,वादविवाद होण्याची शक्यता दिसते,काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलेच बरे,वाहने सावकाश चालवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मैं नहीं खाउंगा, मोटा हो जाउंगा" जयस्वाल केक घेऊन आला, पण 'हिटमॅन'ने दिला नकार Watch Video

Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

Goa Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई: चार व्यवस्थापक अटकेत, मालकाचीही चौकशी होणार

Gautam Gambhir: "ते दोघे बऱ्याच काळापासून..." मालिका जिंकल्यानंतर गौतम गंभीर 'रो-को'बाबत काय म्हणाला?

Goa Live News: Tragically हडफडे नाईट क्लब दुर्घटना, 25 पैकी 5 मृतांची ओळख पटली; झारखंड, रांची, आसाम आणि उत्तराखंडचे रहिवासी

SCROLL FOR NEXT