Rashi Bhavishya 15 October 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 15 October 2024: कुटुंबासोबत आनंद साजरा कराल, मित्रांच्या भेटीचा योग; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

गोमन्तक डिजिटल टीम

आजचे पंचांग

मंगळवार,१५ आक्टोबर २०२४, अश्विन शुक्ल पक्ष,

  • शरद ऋतु,क्रोधी नाम संवत्सर,शके १९४६.

  • तिथि- त्रयोदशी २४l२० (भौमप्रदोष)

  • रास- कुंभ

  • नक्षत्र- पूर्वाभाद्रपदा २२l०९

  • योग - वृद्धी १४l१३

  • करण - कौलव १४l०४

  • दिनविशेष - चांगला दिवस

आजचे राशिभविष्य

(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे)

मेष - मार्केटिंग, सोशल मीडिया इत्यादी क्षेत्रात यश अथवा सन्मान मिळेल अर्थात त्यातून काही आनंद प्राप्ती होईल,कामानिमित्त प्रवास घडेल,त्यातून लाभ थोडा उशिरा किंवा थोड्या अधिक कष्टाने मिळेल परंतु उत्तम मिळेल.

वृषभ - संततीचा सहवास मिळेल, परंतु तो सुखदायी असेलच असे नाही, काही विशेष हट्ट देखील असू शकतो जे पुर्ण करणे शक्य होणार नाही किंवा कदाचित तूम्ही पूर्ण देखील कराल, थोडीशी चिंता भासेल,अध्यात्मिक अभ्यास केल्यास मार्ग मिळेल.

मिथून - द्विधा मनस्थिती सामना करावा लागेल, निर्णय घेण्यासाठी उत्तम मार्गदर्शक शोधा,वाहने सावकाश चालवा, जेवढा लाभ त्यापेक्षा अधिक खर्च होईल असे दिसते.

कर्क - विशेष करून वाहने नियमित चालवावीत,आरोग्याच्या तक्रारी संभवतील, आवडीच्या गोष्टीत मन रमविण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून एकटेपणा दूर होण्यास मदत होईल, दूरचा प्रवास टाळावा.

सिंह - अधिक कष्टांत कमी लाभ होईल, परंतु काहीतरी नवीन विषय शिकण्यास मिळेल अर्थात नवीन अनुभव जीवनात मिळेल,ज्यामुळे पुढे ते कमी येईल,या दिवसात अपघाताचे प्रमाण अधिक आहे वाहने सावकाश चालवावीत.

कन्या - मनाविरूद्ध घटना घडतील, अपेक्षित लाभ विलंबाने होईल, अशक्तपणा जाणवेल, ताणतणाव वाढल्यासारखा वाटेल, विश्रांतीची आवश्यकता भासेल, विश्रांती घेऊन नवीन प्रवासाची सुरुवात करा मग विशेष लाभ होतील.

तूळ - कोणतेही काम शांततापूर्वकच होईल, गडबडीत आलेले हातातले काम निसटून जाण्याची शंका आहे त्यामुळे धैर्याने कार्य करा.

वृश्चिक - अधिकारात वाढ होऊ शकते, कार्ये सफल होईल, महत्त्वपूर्ण कामे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा कराल, शिक्षणासाठी केलेले परिश्रम फलप्रद होतील, व्यवसायात छान नफा होईल,

धनु - मित्रांची भेट होईल, फसवणुक होण्याची संभावना आहे सावध राहावे, करमणुकीत वेळ जाईल.मिळालेला वेळ योग्य ठिकाणी घालवा, जनमानसात जा ज्यामुळे तुमच्या कार्याची मार्केटिंग होऊन तुम्हाला लवकर लाभ मिळेल.

मकर - अधिक घेतलेले श्रम वाया जाऊ शकते, लक्षपुर्वक कार्ये करा,कामात मन लागणार नाही, मानसिक स्थिती थोडी ठीक नसेल,थोडी चलबिचल असेल, कदाचित चिडचिड पण होऊ शकते शक्यतो मौन धारण करावे.

कुंभ - चंचल मानसिकता, काहितरी नविन करावेसे वाटेल, आरोग्य प्रतिकार शक्ति उत्तम जाणवेल, नवीन उर्जा प्राप्त होईल, जलद गतीने कार्ये संपन्न होतील, जोडीदाराकडून धनलाभ होऊ शकेल. वाहने मात्र सावकाश चालवीत.

मीन - प्रवास छान होईल, कुटुंबासह आनंद साजरा कराल,खर्च देखील नियमित होईल, अध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष द्या, तीर्थाटन, कुलदेवतेची यात्रा इत्यादी करण्याचा यत्न करावा ज्यामुळे मनोवांछित कार्ये सफल होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: रतन टाटा यांच्या 'गोवा' श्वानाचा मृत्यू? व्हायरल मेसेजमागील सत्य काय?

Goa Accident News: गोव्यात 'रोड सेफ्टी वीक'च्या पहिल्याच दिवशी अपघातांची मालिका; २४ तासांत पाच घटना

Tata Group: आनंदाची बातमी! येत्या पाच वर्षांत 5 लाख नोकऱ्या देणार टाटा समूह; 'या' क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी

Nave Utsav 2024: ..आता 'भातकापणीला' सुरवात! सातेरी केळबाई देवस्थानचा 'नवे उत्सव' उत्साहात साजरा

Stray Cattles: प्रत्येक तालुक्यात 'गोशाळा' हवी! भटक्या गुरांच्या समस्येवरुन लोबो यांचे मत

SCROLL FOR NEXT