Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Zodiac Personality Traits: शांत बसलेत म्हणजे हार मानली नाही! 'या' 3 राशींच्या माणसांपासून राहा सावध; स्वतःच्या खेळात 'किंग'

3 Zodiac Signs That Speak Bitter Truth: ‘मुंह पर राम, बगल में छुरी’' अशी म्हण आपण अनेकदा ऐकतो. मात्र, ज्योतिषशास्त्रात अशा काही राशी आहेत ज्या या म्हणीच्या अगदी उलट वागतात.

Manish Jadhav

3 Zodiac Signs That Speak Bitter Truth: ‘'मुंह पर राम, बगल में छुरी’' अशी म्हण आपण अनेकदा ऐकतो. मात्र, ज्योतिषशास्त्रात अशा काही राशी आहेत ज्या या म्हणीच्या अगदी उलट वागतात. या राशींचे लोक कुणाला खूश करण्यासाठी तोंडावर गोडगोड बोलत नाहीत, तर इतके कटू बोलतात की, समोरच्याच्या नजरेत ते एका क्षणात 'व्हिलन' बनतात. पण गोष्ट इथेच संपत नाही. हे लोक समोरुन जितके स्पष्टवक्ते दिसतात, पाठीमागे तितकीच तगडी रणनीती आखून संपूर्ण पटच उलथावून टाकतात. चला तर मग जाणून घेऊयात अशा 3 चतुर आणि दूरदर्शी राशींबद्दल, ज्या समोरुन कटू बोलतात पण मागून संपूर्ण गेम कंट्रोल करतात.

पहिली राशी आहे मिथुन. मिथुन राशीचे लोक संवादकौशल्यात अत्यंत तरबेज आणि सामाजिक असतात. बोलण्याच्या ओघात किंवा स्पष्टवक्तेपणामुळे ते अनेकदा समोरच्याला दुखावणारे कटू सत्य बोलून जातात, ज्यामुळे लोक त्यांना लगेच वाईट समजतात. मात्र, या राशीचा स्वामी बुद्धीचा कारक 'बुध' असल्याने हे लोक अत्यंत चाणाक्ष असतात. जेव्हा एखादी गोष्ट स्वतःच्या बाजूने करुन घ्यायची असते, तेव्हा ते आपल्या उत्कृष्ट बोलण्याच्या आणि बौद्धिक कौशल्याचा वापर करुन अशी गुप्त योजना आखतात की सर्वांना त्यांचे म्हणणे मान्य करावेच लागते. समोरुन स्पष्ट बोलून वाईट ठरलेले हे लोक मागून असा काही खेळ खेळतात की सर्व समीकरणे बदलून जातात.

दुसरी राशी आहे वृश्चिक. वृश्चिक राशीचे लोक अत्यंत धाडसी स्वभावासाठी ओळखले जातात. यांना खोटे नाटक आवडत नाही. एखादी गोष्ट आवडली नाही तर ते अजिबात न घाबरता थेट तोंडावर बोलून दाखवतात. त्यामुळे लोक त्यांना निर्दयी किंवा व्हिलन ठरवतात. परंतु, वृश्चिक राशीचे लोक आपली पुढची चाल कधीच कुणाला कळू देत नाहीत. ते अत्यंत शांतपणे परिस्थितीचा अभ्यास करतात आणि योग्य वेळ येताच आपल्या गुप्त रणनीतीने बाजी मारतात.

तिसरी राशी आहे कुंभ. कुंभ राशीचे लोक भावनांपेक्षा नेहमी बुद्धीने आणि व्यवहाराने निर्णय घेतात. कुणाला खोटा दिलासा देण्यासाठी ते कधीही खोटे बोलत नाहीत, जे सत्य आहे तेच थेट सांगतात. यामुळे अनेकदा लोक त्यांना वाईट समजतात. मात्र, कुंभ राशीचे लोक खूप दूरचा विचार करणारे असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa One Time Settlement: वीज-पाणी थकबाकीदारांना मोठा दिलासा; 'वन टाइम सेटलमेंट' पुन्हा राबविणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Team India: व्हीव्हीएस लक्ष्मण हेड कोच, श्रेयस अय्यर कर्णधार; एशियन गेम्ससाठी टीम इंडियाचा नवा मास्टरप्लॅन!

Goa Assembly Election: गोव्यात निवडणूक वेळेवरच! मध्यावधी निवडणुकीचे संकेत नाहीत; फेब्रुवारी अखेर शक्यता

खरी कुजबुज: ...आणि मुख्‍यमंत्री ठरले सगळ्यांत वरचढ

Goa Electricity: 'गोव्यापेक्षा स्वस्त वीजदर दाखवा!' मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट चॅलेंज; घरगुती स्मार्ट मीटरला स्थगिती

SCROLL FOR NEXT