Rashi Bhavishya | Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya: 'या' राशींनी आता थांबायचं नाय! नवीन संधी दरवाजा ठोठावणार; तयार रहा

28 January Horoscope: करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात काही राशींना विशेष लाभ मिळेल, तर काहींना सावधगिरी बाळगणे गरजेचे ठरेल. जाणून घेऊया उद्याचे संपूर्ण राशीभविष्य.

Sameer Panditrao

२८ जानेवारी २०२६ हा दिवस अनेक राशींसाठी नव्या संधी, यश आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात काही राशींना विशेष लाभ मिळेल, तर काहींना सावधगिरी बाळगणे गरजेचे ठरेल. जाणून घेऊया उद्याचे संपूर्ण राशीभविष्य.

मेष – आजचा दिवस अनुकूल ठरेल. धार्मिक कार्यात मन रमेल आणि मंदिर किंवा पवित्र स्थळी जाण्याचा योग आहे. व्यवसायात आर्थिक लाभ संभवतो. सरकारी कामात यश मिळेल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृषभ – घरात आनंदाचे वातावरण राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखकर राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल, मात्र संध्याकाळी खर्च वाढू शकतो.

मिथुन – कामाचा ताण जास्त राहील, पण सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.

कर्क – भाग्याची साथ मिळेल. मालमत्तेशी संबंधित कामात यश मिळू शकते. कुटुंबात प्रेम आणि धार्मिक वातावरण राहील. मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल.

सिंह – कमी प्रयत्नात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात बदल फायदेशीर ठरतील. तांत्रिक किंवा परदेशाशी संबंधित क्षेत्रात यश मिळेल. धार्मिक प्रवासाची योजना होऊ शकते.

कन्या – बुद्धिमत्ता आणि अनुभवामुळे प्रशंसा मिळेल. व्यापार आणि शिक्षणात लाभ होईल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

तूळ – सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. आर्थिक बाबतीत भाग्याची साथ मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात मधुरता राहील.

वृश्चिक – जबाबदाऱ्या वाढतील, पण सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन काम सुरू करण्याचा विचार होऊ शकतो. अचानक आर्थिक लाभ संभवतो.

धनु – दिवस लाभदायक ठरेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि संपन्नतेत वाढ होईल.

मकर – मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. विरोधकांपासून सावध रहा. धार्मिक कार्यात सहभाग होईल आणि पुण्य लाभ मिळेल.

कुंभ – भाग्यात वाढ होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखी राहील आणि यशाची दारे उघडतील.

मीन – सुख-समृद्धीत वाढ होईल. घरात शुभ कार्याचा योग आहे. धार्मिक प्रवासाची शक्यता असून कुटुंबासोबत आनंदी वेळ जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT