Horoscope | Rashi Bhavishya Dainik Gomatnak
Horoscope

Rashi Bhavishya: स्वप्न होणार पूर्ण! नवीन व्यवसायाची तयारी करा; 'या' राशींना मिळणार मोठी बातमी

27 January Horoscope: ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार हा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार असून, काही राशींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Sameer Panditrao

२७ जानेवारी मंगळवारचा दिवस धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचा मानला जातो. मंगळवारी हनुमान उपासना केल्यास भीती, रोग, संकट आणि मानसिक अशांतता दूर होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार हा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार असून, काही राशींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जाणून घेऊया, २७ जानेवारीला मेष ते मीन राशींचे भविष्य कसे असेल.

मेष: आत्मविश्वासात वाढ होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता मजबूत राहील. मात्र मन थोडे अस्थिर राहू शकते, त्यामुळे संयम राखणे गरजेचे आहे. कुटुंबीयांबरोबर नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.

वृषभ: मानसिक ताण वाढू शकतो. व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या. खर्च वाढू शकतात, आरोग्याकडे लक्ष द्या.

मिथुन: नोकरीत बदलाचे योग आहेत, जे सुरुवातीला कठीण वाटतील पण भविष्यात प्रगतीची दारे उघडतील. प्रवास वाढू शकतो, थकवा जाणवेल.

कर्क: आत्मविश्वास चांगला राहील. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कार्यक्षेत्रात मान-सन्मान मिळण्याचे योग आहेत.

सिंह: मन प्रसन्न राहील आणि व्यवसायात प्रगती दिसेल. आरोग्याची काळजी घ्या. वाहन सुख मिळण्याची शक्यता आहे.

कन्या: नोकरीत स्थानांतर किंवा बदल संभवतो. खर्च वाढतील, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे.

तूळ: मित्रांच्या सहकार्याने नवीन व्यवसाय सुरू होऊ शकतो. दिवसभर धावपळ वाढेल, थकवा जाणवेल.

वृश्चिक: संयम राखणे फायदेशीर ठरेल. पालकांचे मार्गदर्शन मिळेल. नवीन उद्योगाची सुरुवात होण्याचे संकेत आहेत.

धनु: मित्रांच्या मदतीने व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. मानसिक शांततेसाठी संयम आवश्यक आहे.

मकर: आर्थिक दबाव वाढू शकतो. व्यवसायात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ: कुटुंबाचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.

मीन: वाणी मधुर राहील, पण खर्च वाढू शकतात. नोकरीत बदलाची शक्यता असून कुटुंबापासून दूर जावे लागू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT