Zuari Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Zuari Bridge Accident : नव्या झुआरी पुलावर पहिला अपघातबळी

नवीन वर्षाच्या एकूण ५० दिवसांत एकूण ४५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Zuari Bridge Accident : नवीन झुआरी पुलावर आज एका कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नवीन पुलावरील हा पहिला जीवघेणा अपघात ठरला. दरम्यान, नवीन वर्षाच्या एकूण ५० दिवसांत एकूण ४५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

आज सकाळी ११ वाजता दुचाकीस्वार रोझारिओ डिसोझा (६१, रा. बाणावली) व त्यांची पत्नी वेर्णाहून पणजीच्या दिशेने जात असताना नवीन झुआरी पुलावर पोहोचले. त्यावेळी ‘रेन्ट अ कार’ चालकाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

यात दुचाकीचालक रोझारिओ यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर सध्या बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.

ट्रकच्या धडकेत पादचारी ठार

वास्को : सांकवाळ पठारावरील कला भवनासमोरच्या महामार्गावर शनिवारी दुपारी ट्रकच्या धडकेत मिंगेल वाझ (५५, रा. पाळे वेलसाव) हे जागीच ठार झाले. मिंगेल यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती.

शनिवारी ते घरातून बाहेर पडल्यावर सांकवाळ कलाभवन येथे पोहोचले असता त्यांना ट्रकची धडक बसली. वेर्णा पोलिसांनी ट्रकचालक समीरा डी सिलेंद्रा (रा.बेळगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT