Bail! Dainik Gomantak
गोवा

Goa News : जामीन मिळूनही ७ महिने कोठडीतच ! गोवा खंडपीठाने घेतली दखल

म्हापसा पोलिसांनी गेल्यावर्षी ३ ऑक्टोबर २०२२ रोजी संशयित झहिर शेख याला ११ ग्रॅम कोकेन बाळगल्याप्रकरणी म्हापसा नव्या बसस्थानकावर अटक केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी ड्रग्जप्रकरणी अटक झालेल्या झहिर शेख याला ७ महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने सशर्त जामीन दिल्यानंतर त्याच्याकडे गोव्यातील पुराव्यासह रहिवाशी पत्ता नसल्याने त्याला कोठडीतच मुक्कामाची वेळ आली.

त्यामुळे या अटीत सुधारणा करण्याची त्याने केलेली विनंती उच्च न्यायालयाने ग्राह्य धरून ही अट शिथिल केली आहे, मात्र त्याला गोव्याबाहेर परवानगीशिवाय न जाण्याची अट कायम ठेवली आहे.

म्हापसा पोलिसांनी गेल्यावर्षी ३ ऑक्टोबर २०२२ रोजी संशयित झहिर शेख याला ११ ग्रॅम कोकेन बाळगल्याप्रकरणी म्हापसा नव्या बसस्थानकावर अटक केली होती.

त्याच्यावर आरोपपत्र सादर केल्यानंतर त्याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, तो फेटाळला होता.त्याचा रहिवासी पत्ता नसल्याने पोलिसांनी त्याच्या अर्जाला विरोध केला होता.

कायमस्वरूपी रहिवासाची अट शिथिल

उच्च न्यायालयात संशयित झहिर शेख याने केलेल्या अर्जाला म्हापसा पोलिसांनी विरोध केला होता. संशयिताने बेळगावचा मूळ रहिवाशी पत्ता दिला होता, तो कायमचा नाही तसेच गोव्यातही तो त्याने मेहुण्याकडे राहत असलेला पत्ता दिला आहे,

असे विरोध केलेल्या उत्तरात म्हटले होते. संशयिताला जामीन मिळूनही तो रहिवासी पत्त्याअभावी कोठडीत आहे, याची दखल घेत उच्च न्यायालयाने २२ फेब्रुवारी रोजीच्या आदेशात सुधारणा करत त्याच्या कायमस्वरुपी गोव्यातील रहिवासाची अट शिथिल करत इतर अटी कायम असतील, असे नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT