Yuri Alemao | Aleixo Sequeira Dainik Gomantak
गोवा

Bhutani Project: 'भूतानी’शी संबंधितांची नावे मुख्यमंत्र्यांनी उघड करावीत; युरींचा हल्लाबोल; सिक्वेरांचे मात्र मौन

Bhutani Project Sancoale: राज्य सरकारला जनतेची काळजी नसल्याने नाईक यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी केली. पर्यावरण व कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी भूतानी प्रकल्पावर कारवाईसंबंधी मौनच बाळगले.

गोमन्तक डिजिटल टीम

Yuri Alemao About Bhutani Infra Project Sancoale

पणजी: ‘भूतानी’ प्रकल्पाला दिलेला परवाना मागे घ्यावा, यासाठी सांकवाळचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांनी उपोषण सुरू केले आहे. परंतु राज्य सरकारला जनतेची काळजी नसल्याने नाईक यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

भूतानी प्रकल्पाविरोधात नाईक यांच्या उपोषणाचा शुक्रवारचा पाचवा दिवस. ज्येष्ठ नागरिक उपोषणाला बसले आहेत, त्याची सुद्धा पर्वा राज्य सरकारला नाही. भाजप सरकार स्वतःच्या निर्णयावर ठाम असल्याचे यावरून दिसते. नाईक यांनी आरोग्याच्या कारणास्तव उपोषण मागे घेण्याचे आवाहन युरी यांनी केले आहे. राज्याच्या पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या प्रकल्पांविरोधातील लढाईत आपण सर्व जण एकवटले आहोत.

सरकारमधील मंत्र्यांची भूतानींशी हातमिळवणी आहे आणि त्यांची कृती याचा पुरावा आहे. काही आठवड्यांपूर्वी बदली झालेले सचिव पुन्हा त्याच पंचायतीत परततात, ते कसे? बीडीओमध्ये अनेक सचिव कुठल्याच पंचायतीचा ताबा नसताना बसलेले आहेत. मग बदली झालेल्या सचिवांना परत का आणले जाते?, असा सवाल करीत युरी म्हणाले, की 'भूतानी’शी संबंधितांची नावे उघड करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवावे.

भूतानीवर कारवाईबाबत मंत्री सिक्वेरांचे मौनच

सांकवाळ येथील भूतानी मेगा प्रकल्पावरून जो असंतोष निर्माण झाला आहे, तो सोडविण्यास सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याची दखल घेतली असून हा प्रश्न ते हाताळत असल्याचे पर्यावरण व कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले. मात्र त्यांनी भूतानी प्रकल्पावर कारवाईसंबंधी मौनच बाळगले.

या प्रकल्पाविरोधात प्रेमानंद नाईक हे उपोषणाला बसले आहेत. यात सुद्धा काही एनजीओ कार्यकर्ते घोळ घालीत आहेत. काहीजण नाईक यांनी उपोषण मागे घ्यायची विनंती करीत आहेत तर काहीजण पाठिंबा देण्याच्या नावावर त्यांना भेटत आहेत. हे आपल्याला बिलकूल पसंत नाही, नाईक यांच्या आरोग्याचा प्रश्न पाहता आपण त्याला उपोषण मागे घ्यायची विनंती करीत आहे, असे सिक्वेरा म्हणाले.

सिक्वेरा शुक्रवारी जिल्हा प्रशासन इमारतीत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. लोक आपल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन आले होते, असे त्यांनी सांगितले. चिकन मास विक्रेत्यांनी त्यांची भेट घेतली व त्यांची कचरा समस्या मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT