Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao : मुख्यमंत्र्यांचे 'ते' आश्वासन माझ्यासाठी अभिमानाचा क्षण : युरी आलेमाव

संपूर्ण गोव्यातील 51 स्थळे अधिसूचित केल्याचे यादीसह लेखी उत्तर मिळाले अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : गोव्यातील ऐतिहासिक स्थळे अधिसूचित करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आभारी आहे. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी म्हटलं आहे. आपण पुरातत्व विभागाकडून गोव्यातील अधिसूचित ठिकाणांची माहिती घेण्यासाठी तारांकित प्रश्न विचारला होता. मला संपूर्ण गोव्यातील 51 स्थळे अधिसूचित केल्याचे यादीसह लेखी उत्तर मिळाले अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.

पुरातत्व खात्याच्या उत्तरात कुंकळ्ळी येथील चिफटेन्स मॅमोरीयल, मडगाव येथील लोहिया मैदान, पणजीचे आझाद मैदान, असोळणा आणि पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारके तसेच गोवा क्रांती चळवळ आणि गोवा मुक्ती लढा यांच्याशी संबंधित स्मारके आणि ठिकाणे सरकारने अधिसूचित केलेली नाहीत असे स्पष्ट झाले. चांदोर येथील प्राचीन महादेव मंदिर देखील सदर यादीत नाही असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

आपण आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला आणि सदर ऐतिहासिक ठिकाणांचे पावित्र्य जपले जाणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले व सरकारने सदर ऐतिहासिक स्थळे तातडीने अधिसूचित करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मला सकारात्मक उत्तर देऊन त्यानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचा मला आनंद आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

मला आशा आहे की सरकार लवकरात लवकर अधिसूचना जारी करेल आणि गोव्यातील अशा सर्व ऐतिहासिक स्थळांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेईल, असे युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT