Yuri Alemao
Yuri Alemao Daink Gomantak
गोवा

Goa: विधानसभा कामकाज सल्लागार समितीची तातडीने बैठक घ्या; युरी आलेमाव यांची तवडकरांकडे मागणी

दैनिक गोमन्तक

Goa: जानेवारी 2023 मध्ये 16 ते 19 या चार दिवसीय विधानसभा अधिवेशनाच्या कालावधीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सभापती रमेश तवडकर यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी कामकाज सल्लागार समितीची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी केली आहे.

अधिवेशनाचा कालावधी दोन ते तीन आठवड्यांपर्यंत वाढविण्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक घेणे आवश्‍यक असल्याचे आलेमाव यांनी पत्रात नमूद केले आहे. त्याचबरोबर 26 ते 28 डिसेंबर या नाताळ व नववर्ष स्वागत उत्सवांच्या दिवसांत तारांकित प्रश्न मांडण्याची मुदत देऊन वेळापत्रक जाहीर केल्याने एकप्रकारे आमदारांची कोंडी करण्यात आली आहे. त्यामुळे ही मुदत वाढविणे गरजेचे आहे. यासाठी समितीची बैठक होऊन चर्चा होणे अपेक्षित आहे.

विरोधी आमदारांना कामकाजात समान संधी मिळावी, विविध मुद्यांवर आवाज उठविण्यासाठी, सहभागी होण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. चार दिवसांच्या चार दिवसांच्या अधिवेशनाचा पहिला दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावर जाणार आहे. आमदारांना खासगी ठराव आणि खासगी विधेयके मांडण्याची संधी मिळणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

केवळ तीन तारांकित प्रश्‍न

विधानसभेच्या सचिवांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकात मंगळवारी (17 जानेवारी) मुख्यमंत्र्यांसह पाच कॅबिनेट मंत्र्यांच्या 26 खात्यांसाठी तारांकित प्रश्न मांडावे लागतील. बुधवारी (18 जानेवारी) मुख्यमंत्र्यांसह चार कॅबिनेट मंत्र्यांच्या 21 खात्यांचे प्रश्न आणि गुरुवारी (19 जानेवारी) चार कॅबिनेट मंत्र्यांच्या 16 खात्यांचे प्रश्न मांडता येणार आहेत.

त्यामुळे दररोज फक्त तीन तारांकित प्रश्न आणि पंधरा अतारांकित प्रश्न विचारण्याचे बंधन असल्याने विधानसभेच्या सदस्यांना इतर खात्यांशी संबंधित सार्वजनिक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करताच येणार नाहीत, असेही आलेमाव यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Gas Leakage: गॅस बंद न करता झोपी गेले; वास्कोत गुदमरुन वाराणसीच्या एकाचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

Netravali: नेत्रावळीत शिकार पार्टीचे नियोजन भोवले; कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना काडतूससह रंगेहाथ पकडले

तेलंगणात 2.07 कोटी गोवा बनावटीचे मद्य जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात दारु तस्करी

UP Crime: गर्लफ्रेन्डचे गोव्याला जाण्याचे स्वप्न पूर्ण करणं आलं अंगलट; सहा महिने वाचवलेले पैसे पाण्यात

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT