Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: गोव्याच्या बदनामीसाठीच तेलंगणा, हैदराबादचे छापे, कोलवाळ कारागृहात चालते मोठे ड्रग्ज रॅकेट; आलेमाव यांचा घणाघात

CM Pramod Sawant: तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना तसेच गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविले आहे. मात्र, अद्याप त्याला उत्तर आले नसल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याची बदनामी करण्यासाठीच तेलंगणा आणि हैदराबाद पोलिसांकडून राज्यात छापे टाकून ड्रग्ससंदर्भात खोटे आरोप केले जात असून नवे पोलिस महासंचालक यासंदर्भात या राज्यांतील महासंचालकांशी चर्चा करतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.

कोलवाळ कारागृहातून मोठे ड्रग्स रॅकेट चालविले जाते, तसेच तेलंगणा पोलिसांनी छापे टाकून गोव्यातील काही ड्रग्स विक्रेत्यांना अटक केल्याचा दावा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पोलिस, कारागृह व इतर खात्यांच्या मागण्यांवरील चर्चेवेळी विधानसभेत केली. यासंदर्भात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना तसेच गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविले आहे. मात्र, अद्याप त्याला उत्तर आले नसल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

हल्लीच पोलिस मुख्यालयातून एक पत्र जारी केले होते, त्यामध्ये काही पोलिस ड्रग्स व मद्याच्या आहारी गेले आहेत तसेच पोलिस स्थानकात जुगारही चालतो. त्यामुळे ड्युटीवर असताना व्यसनाच्या आहारी केलेल्या पोलिसांची यादी तयार करून ती सादर करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांना दिले होते. जर पोलिस व्यसनाधीन होऊ लागले तर ते लोकांना न्याय देणार का, असा प्रश्‍न आलेमाव यांनी केला. या व्यसनी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

पुरावे गोळा करण्यात पोलिस मागे

पोलिस तपासाची टक्केवारी चांगली आहे. मात्र, न्यायालयात गुन्हेगारांना शिक्षा होण्याची टक्केवारी खूपच कमी आहे. ही टक्केवारी भारतातील टक्केवारीपेक्षा कमी आहे. पोलिस आवश्‍यक प्रमाणात पुरावे जमा करण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे संशयित पुराव्याअभावी मोकळे सुटतात. त्याला सरकारी वकील जबाबदार नाहीत, तर पोलिस तपासातील त्रुटी जबाबदार आहेत, असे युरी म्हणाले.

कोलवाळ कारागृह असुरक्षित

कोलवाळ कारागृहात मोठ्या प्रमाणात ड्रग्स सेवन तसेच मोबाईलचा वापर होत आहे. बलात्कार प्रकरणातील एका संशयिताने कारागृहातूनच पीडितेला फोन करून तिला तक्रार मागे घे, नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावरून या कारागृहातील सुरक्षेबाबत संशय निर्माण झाला आहे. कारागृहातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कारवाया परराज्यांत सुरूच आहेत. हे कारागृह सुरक्षित नाही, असा आरोप आमदार आलेमाव यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT