floral tributes TO Statue of Dr. Rammanohar Lohia By Goa Gongress Dainik Gomantak
गोवा

Goa Revolution Day 2023: गोवा क्रांती दिनाचा कार्यक्रम लोहिया मैदानावर साजरा करा : आलेमाव

कॉंग्रेस पक्षातर्फे स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Revolution Day 2023: डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. ज्युलियाओ मिनेझिस यांनी गोवा मुक्ती चळवळीची ज्योत 18 जून रोजी लोहिया मैदानावर प्रज्वलित केली होती.

त्यामुळे गोवा क्रांती दिनाचा कार्यक्रम हा मडगाव येथील लोहिया मैदानावर साजरा झाला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज सरकारकडे केली.

सरकारने स्वातंत्र्य संग्रामातील स्मारके, मंदिरांचे संरक्षण केले पाहिजे तसेच स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा, असे आवाहनही आलेमाव यांनी केले.

गोव्याच्या क्रांतिदिनी डॉ. लोहिया मैदानावर कॉंग्रेस पक्षाने डॉ. राम मनोहर लोहिया तसेच शहीद स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली.

या प्रसंगी गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमीत पाटकर, खासदार फ्रांसिस सार्दीन, दक्षिण गोवा कॉंंग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

गोवा दमण दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष गुरुदास कुंदे यांनी जे प्रश्र्न व चिंता व्यक्त केल्या आहेत त्या सोडविण्याचे आवाहन युरी आलेमाव यानी मुख्यमंत्री डॉ़. प्रमोद सावंत यांना केले.

स्वातंत्र्यसैनिकांची पेन्शन वेळेवर द्या व त्यांच्या मुलांना नोकऱ्या देण्यास सरकारने प्राधान्य द्यावे. आग्वाद व रेईश मागोस किल्ल्यांचे जतन करा. तिथे दारुची दुकाने उघडण्यास मनाई करावी असे आलेमाव यांनी सांगितले..

सौर उर्जे संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारचे कौतुक केले याचा मला आनंद आहे. सरकारने तीन रेखीय प्रकल्प जे पर्यावरण जतनाच्या विरोधी आहे ते रद्द करावे असेही आलेमांव यानी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

Sheikh Hasina: "माझी हत्या होऊ शकते, पण तरीही मी...," शेख हसीना बांगलादेशला परतणार; कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

SCROLL FOR NEXT