Curchorem Bike Stunt Dainik Gomantak
गोवा

Curchorem Bike Stunt: कुडचडेतील सार्वजनिक रस्त्यावर स्पोर्टस् बाईक चालकांचे जीवघेणे स्टंट

तरूण सार्वजनिक रस्त्यावर जीवघेणे स्टंट करत स्वत: आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत.

Pramod Yadav

Curchorem Bike Stunt: गोव्यात हुल्लडबाजी करणाऱ्यांची कमी नाही. यात बाहेरून येणारे पर्यटक यांचा समावेश तर आहेच शिवाय काही स्थानिक देखील यात मागे नाहीत. काहीजण राज्यातवर जीवघेणे स्टंट करून त्यांचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालतात. अशीच एक घटना कुडचडे येथून समोर आली. येथील काही तरूण सार्वजनिक रस्त्यावर जीवघेणे स्टंट करत स्वत: आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत.

याप्रकरणी व्हिडिओ समोर आला असून, यात काही तरूण कुडचडेतील सार्वजनिक रस्त्यावर जीवघेणे स्टंट करताना दिसत आहेत. सुरूवातीला एक तरूण केटीएम बाईकवरून स्टंट करताना दिसत असून, त्यानंतर तो बाईकचे समोरील चाक उचलून एका चाकावर भरधाव वेगाने गाडी चालवताना दिसत आहे.

व्हिडिओत पुढे तीन ते चार तरूण स्पोर्टस् बाईकवरून विविध स्टंट करत आहेत. तरूणांच्या स्टंटमुळे ते स्वत:चा आणि इतरांचा देखील जीव धोक्यात घालत आहेत.

पोलिस प्रशासनाचे दुर्लेक्ष

कुडचडेतील सार्वजनिक रस्त्यावर तरूणांद्वारे केल्या जात असलेल्या जीवघेण्या स्टंटकडे पोलिस प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लेक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. धोकादायक स्टंट तरूण रस्त्यावर कसे करू शकतात असा प्रश्न येथील स्थानिक विचारत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Positive Story: ..घे उंच भरारी! मयेतील कुटुंबाचा जिद्दीचा प्रवास; अळंबी उत्पादनातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Viral Video: दगड उगारला अन् माकड चवताळलं! आजीला 'ती' चूक पडली महागात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतली मजा

US Iran War: 'तुमची लढाई तुम्ही लढा, अमेरिका मदतीला येणार नाही!'; इराण युद्धावरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनसह 'नाटो' देशांवर संताप

"वैभव सूर्यवंशी लहान आहे, टीम इंडियात आणण्याची घाई कशाला?" अश्विनची रोखठोक प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला दिग्गज फिरकीपटू?

US Iran War: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी युद्ध संपवण्याची तयारी; इराणची लष्करी ताकद नष्ट करण्यासाठी ट्रम्पचा 'मास्टर प्लॅन'!

SCROLL FOR NEXT