Accident Dainik Gomantak
गोवा

Bihar: लवकरच मिळणार होती गुड न्यूज, गरोदर बायकोला भेटण्यासाठी गावी गेलेल्या तरुणाला ट्रॅक्टरने चिरडले

Bihar Accident Death Case: गोव्यात काम करणारा तरुण गरोदर पत्नीला पाहण्यासाठी बिहार राज्यातील गावी गेला असता काळाने घाला घातला.

Pramod Yadav

Accident Death Case

गरोदर बायकोला भेटण्यासाठी गोव्यातून गावी गेलेल्या तरुणाला बिहारमधील तेलाध गावाजवळ वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने चिरडले. तरुण शौचानंतर परत येताना गुरुवारी (दि.09) रात्री आगियाव बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सनी श्रावण पासवान (24, तेलाध) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गोव्यात कुठल्यातरी कंपनीत कामाला होता. काही दिवसांपूर्वीच तो गरोदर पत्नीला भेटण्यासाठी गावी आला होता. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला.

मृत सनी वीस दिवसांपूर्वी पत्नीची प्रकृती जाणून घेण्यासाठी आणि कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गावी आला होता. गुरुवारी सायंकाळी उशिरा शौचासाठी तो घराबाहेर पडला असता, भरधाव वेगात असलेल्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने त्यांना चिरडले.

अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले, दरम्यान तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला.

अपघातानंतर मृत सनीच्या घरी चिंतेचे वातावरण आहे. तीन भाऊ आणि दोन बहिणींमध्ये सनी पासवान चौथा होता. त्यांना दीड वर्षाची मुलगीही आहे. मृताची पत्नी शोभा देवी यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांनी फरार ट्रॅक्टर चालकाच्या अटकेची मागणी केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणात ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

सॅम्युअल मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिस अधीक्षकांनी नोंदवले ब्रागांझा कुटुंबीयांचे जबाव, पोलिसांच्या कारवाईवर आमदार फेरेरांचे आक्षेप

Mala Lake Fish Death: मळा तलावातील माशांचा रहस्यमय मृत्यू! उच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर 32 घरांना बसला सांडपाणी जोडणीचा वेढा

SCROLL FOR NEXT