Margao Accident  Dainik Gomantak
गोवा

मडगाव परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

युवकाची ओळख पटवण्यात पोलिसांना अपयश

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : एका अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने जखमी झालेल्या युवकाचा गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्‍यू झाला. तो अंदाजे 20 ते 25 वर्षांचा असून मडगाव पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मयताची ओळख पटलेली नाही. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा अपघात मडगाव येथील एका हॉस्पिटलजवळ घडला.

हा तरुण रस्त्याच्या मधोमध बसला असता त्याला चारचाकी वाहनाने धडक देऊन पळ काढला. नंतर त्याला एका दुचाकीचीही धडक बसली होती. याबाबत मडगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, दक्षिण गोव्यातील नावेली येथे एक व्यक्ती तळ्यात बुडाल्याची घटना घडली आहे. दारुच्या नशेत तळ्यात उतरलेल्या इसमाचा बुडून मृत्यू झाला आहे. तियागो मारियानो पिरिस असं या 52 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.

नावेली येथे असलेल्या एका तळ्यात तो आंघोळीसाठी उतरला होता. काही वेळ झाल्यांनतर तो बाहेर आला नसल्याने त्याच्या अन्य एका नातेवाईकाने तळ्यात उतरून त्याचा शोध घेतला. यावेळी नाकातोंडात पाणी गेलेल्या अवस्थेत त्याला बाहेर काढण्यात आलं. हालचाल न दिसल्याने त्याला मडगाव येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा बुडालेला व्यक्ती दारुच्या नशेत असल्याचं निष्पन्न झालं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT