Crime News Dainik Gomantak
गोवा

गांजा तस्करी! सावंतवाडीतील तरूणाला पेडण्यात अटक, झारखंड येथील युवकही ताब्यात

गोव्यात अमली पदार्थ तस्करीच्या घटना वारंवार समोर येत आहेत.

Pramod Yadav

गोव्यात अमली पदार्थ तस्करीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. राज्यात विविध ठिकाणी अमली पदार्थ तस्करीच्या घटनांवर पोलिस यंत्रणा लक्ष ठेऊन असते. दरम्यान, दोन ठिकाणी गुन्हे शाखेने कारवाई करत दोघांना अटक करण्यात आली आहे.

गांजा बाळगल्याप्रकरणी पेडणे येथील घटनेत सावंतवाडीच्या तर दुसऱ्या एका घटनेत झारखंड येथील युवकाला अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेने पोरसकोडे, येथे अमली पदार्थ तस्करी प्रकरणी कारवाई केली. या कारवाईत सावंतवाडी येथील रहिवाशी तरूणाला देखील अटक केली आहे. नासिर हुसैन (वय 23) असे अटक तरूणाचे नाव आहे.

त्याच्याकडून 2.50 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात दोन लाख 05 हजार रूपये किंमत आहे. अशी माहिती समोर आली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

तसेच, गुन्हे शाखेने दुसऱ्या एका कारवाईत झारखंड येथील युवकाला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. सुरेश कुमार (वय 24, रा. धनबाद, झारखंड) असे अटक संशयित आरोपीचे नाव आहे.

संशयिताकडे काळ्या रंगाची एक बॅग होती, त्यात अमली पदार्थ असण्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यात 1.100 किलोग्रॅम वजनाचा गांजा सापडला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुझूकीची दुचाकी देखील जप्त केली आहे. असा एकूण 1 लाख दहा हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT