Goa Police  Dainik Gomantak
गोवा

होळीदिवशी तरुणाला बेदम मारहाण, दोन पोलीस निलंबित

कोडार - बेतोडा येथे बाचाबाचीच्या प्रकरणातून पोलिसांनी मारहाण केल्याची माहिती

दैनिक गोमन्तक

फोंडा : होळीच्या दिवशी काल शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कोडार - बेतोडा येथे बाचाबाचीच्या प्रकरणातून पोलिसांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित पोलिस कॉन्स्टेबल रामा खाणेकर आणि ओंकार मानकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

कोडार येथे या दोन्ही पोलिसांनी (Police) महेश मोहनलाल जयस्वाल राहणार कुर्टी - फोंडा या 26 वर्षीय तरुणाला लाठीने जबर मारहाण केली. या मारहाणीत महेश जयस्वाल जखमी झाला असून त्याला उपचारासाठी फोंडा (Ponda) आयडी इस्पितळात नेण्यात आले. ही मारहाण इतकी गंभीर होती की तरुणाच्या पाठीवर याचे व्रण दिसत आहेत.

कायदा हातात घेऊन महेश जयस्वाल याला मारहाण केल्याप्रकरणी फोंडा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक साजित पिल्ले यांनी पोलिस निरीक्षकाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. यानंतर रामा खाणेकर आणि ओंकार मानकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT