Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: दुसऱ्यावर प्रेम करते म्हणून तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण, भिंतीवर आपटले डोके; तरुणाविरोधात गुन्हा

Goa Crime News: मारहाण झालेल्या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

Pramod Yadav

मडगाव: दुसऱ्यावर प्रेम करते म्हणून तरुणीला मारहाण केल्याची घटना कंकुळ्ळीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तरुणाने तरुणीच्या कामाच्या ठिकाणी जात मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

दिलीप वेळीप (रा. पाड्डी, बार्शे) याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मारहाण झालेल्या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी काम करत असलेल्या ठिकाणी दिलीप वेळीपने जात. तरुणी दुसऱ्या मुलावर प्रेम करते का? याबाबत विचारणा केली. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. संशयित दिलीपने तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, तरुणीचे डोकेही भिंतीवर आपटले.

या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी तरुणीने कुंकळ्ळी पोलिसांत धाव घेत झालेल्या प्रकाराचे कथन केले. पोलिसांनी याप्रकरणी दिलीप याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT