Death  Dainik Gomantak
गोवा

नुवे येथे तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू

मृत तरुण मद्यधुंद अवस्थेत बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतीवर झोपला होता : पोलीस

दैनिक गोमन्तक

नुवे येथे इमारतीवरून पडून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुडतरी पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार या मृत्यूमागे कोणता ही अनुचित प्रकार असण्याची शक्यता कमी आहे. कारण घटना घडली त्यावेळी मृत तरुण हा मद्यधुंद अवस्थेत होता. अशा अवस्थेत तो बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या टेरेसवर झोपण्यासाठी गेला असता ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. (Young man dies after falling from building in Nuvem )

पोलीस उपनिरीक्षक करिश्मा प्रभू यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांना या घटनेत कोणताही अनुचित प्रकार घडला नसावा अशी शक्यता व्यक्त केली असुन, प्रत्यक्ष उपस्थित राहात नोंदवल्या गेलेल्या निरिक्षणाच्या आधारे अनैसर्गिक मृत्यू झाल्याचं नोंद करत गुन्हा दाखल केला आहे.

पंचनामा पुर्ण झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात ठेवला आहे. तसेच तो योग्य ती प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर नातेवाईकांच्याकडे दिला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT