Vasco Police  Dainik gomantak
गोवा

गांजा बाळगल्याप्रकरणी वास्कोत तरुणाला अटक

दैनिक गोमन्तक

गांजा बाळगल्याप्रकरणी वास्को पोलिसाकडून सुमित कुंजन (वय 19) या युवकाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 509 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. बाजारपेठेत या गांजाची किंमत 50 हजार 900 रुपये एवढी होत आहे.

वास्को (Vasco) पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री वास्को पोलिस (Police) गस्तीवर असताना वरुणापुरी येथे रात्री 11 वाजता एक युवक हातात काळ्या रंगाची पॉलिथिन पिशवी घेऊन उभा असलेला दृष्टीपथास पडला असता, त्याला पोलिसांनी हटकले.

यावेळी त्याच्या हालचालीवर पोलिसांना संशय आला असता त्याने त्याच्या हातातील पिशवी तपासून पाहिली असता, त्यात पिशवीत पोलिसांना हिरवट पानाचा पदार्थ गांजा असल्याचा संशय आला. त्याने पडताळून पाहिले असता त्यात तपकिरी रंगात 509 ग्राम भजनाची गांजा लपवलेली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 50 हजार 900 एवढी होत आहे. आरोपी सुमित कुंजन (वय 19) हा मुंडवेल वाडे येथे पै इमारतीत राहत असून वास्को पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास वास्को पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक गणेश मातोंडकर करीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT