Vaccination Goa
Vaccination Goa 
गोवा

Vaccination Goa: वावूर्ला येथे टिका उत्सवात 105 वर्षाच्या शाणू वेळीप यांचा सहभाग

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी: goa Government सरकारच्या ‘टिका उत्सव-3(tika utsav) या उपक्रमाला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी 18,662 जणांनी लस(Vaccine) घेतली. एका दिवसात झालेले हे सर्वाधिक लसीकरण ठरले. यापुढेही लसीकरण चालूच राहणार आहे. राज्यातील 40 स्थायी लसीकरण केंद्रासह एकूण 228 केंद्रामध्ये ही लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. 31 जुलै 2021 पर्यंत राज्यातील शंभर टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचे ध्येय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठेवले आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात नागरिकांना लस देण्यासाठी टिका उत्सवाचे आयोजन केले आहे.

याआधी, दोन टप्प्यात टिका उत्सवाचा उपक्रम राबविण्यात आला. आता तिसरा टप्पा सुरु आहे. डॉक्टर, परिचारिका ,आरोग्य कर्मचारी राज्यातील इस्पितळे, पंचायती, पालिका व इतर ठिकाणी स्थापन केलेल्या केंद्रात जाऊन 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देत आहेत.6 लाख 27 हजार लसीकरण 13 जूनपर्यंत राज्यात 6 लाख 27 हजार  881 एवढे लसीकरण झाले. यामध्ये18.166 व्यक्तींनी पहिला तर 496 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. पहिला डोस  घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी 84 दिवसांचा कालावधी ठरविण्यात आल्यामुळे दुसरा डोस  घेण्याच्या प्रतीक्षेत राज्यातील लाखो नागरिक आहेत. 

भारतीय जनता पक्षाचे आमदार, मंत्री, कार्यकर्ते त्याचबरोबर  गावातील सरपंच ,पंच, पालिकांचे नगरसेवक  लोकांनी टिका उत्सवात सहभागी होऊन कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी यासाठी जागृतीकेली. त्यांनी लोकांना लसीकरण केंद्रापर्यंतही आणले. राज्यातील ज्या नागरिकांनी अद्याप लस घेतली नाही. त्यांनी ती घ्यावी, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

105 वर्षीय शाणू वेळीपचा सहभाग
वावूर्ला येथे आयोजित केलेल्या लसीकरण शिबिरात 105 वर्षाच्या शाणू वेळीप यांनी लस घेतली. गावात पक्की सडक नसल्याने लसीकरण केंद्रापर्यंत जाणे या गावातील लोकांना शक्य नसल्याने लसीकरण केंद्रच गावात आणले गेले. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. बाळ्ळी आरोग्यकेंद्राच्या डॉ. तुळशीममता काकोडकर यांनी त्यासाठी सर्व ती मदत केल्याचे कवळेकर यांनी सांगितले. यावेळी स्थानिक पंच श्रद्धा वेळीप, उल्हास वेळीप, सुरेश वेळीप उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Tim Cook: ‘’ॲपलच्या भारतातील कामगिरीवर खूप खूश, प्रतिस्पर्धी म्हणून राहण्यासाठी...’’

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT