Yellow alert issued in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Updates : गोव्यात पाच दिवस जोरदार पाऊस; 16 सप्टेंबरपर्यंत ‘यलो अलर्ट’

गोवा वेधशाळेद्वारे 13 केंद्रावरून पावसाचे मापन केले जाते. या 13 केंद्रांपैकी 7 केंद्रामध्ये 100 इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Rain Updates : गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. आतापर्यंत राज्यात 101.86 इंच म्हणजेच 2587.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 16 सप्टेंबरपर्यंत काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गोवा वेधशाळेद्वारे 13 केंद्रावरून पावसाचे मापन केले जाते. या 13 केंद्रांपैकी 7 केंद्रामध्ये 100 इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद वाळपई केंद्रात झाली असून तिथे 137 इंच (3481 मि.मी.) पाऊस झाला. त्या खालोखाल पेडणे 129, सांगे 114, केपे 113, काणकोण 109, फोंडा 102, साखळी 100.25, म्हापसा 94, जुने गोवा 92.20, पणजी 88.27, मुरगाव 85.33, मडगाव 82.99, दाबोळी 79.48 इंच पावसाची नोंद आहे.

जुलैच्या शेवटपासून ऑगस्ट महिन्यात कमी झालेला पाऊस, गेल्या चार दिवसांपासून पुन्हा सक्रिय झाला आहे. रविवारी मॉन्सून पावसाने इंचाच्या आकडेवारीमध्ये शंभरी गाठली आहे. मात्र, यापूर्वीच पाच तालुक्यांमध्ये शंभर इंचापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. राज्याची सरासरी गाठण्यासाठी पावसाला रविवारचा दिवस उजाडावा लागला. अलीकडील दहा वर्षांतील ही सर्वात उशिराची शंभरी आहे.

यंदा अंदमान-निकोबारमध्ये सर्वात अगोदर 22 मे ला मॉन्सून सक्रिय झाला. केरळमध्येही त्याने अगोदरच हजेरी लावली. मात्र, राज्याच्या उंबरठ्यावर कारवारजवळ त्याने चक्क दहा दिवसाचा मुक्काम ठोकल्याने राज्यात उशिरा 10 जूनला मॉन्सून पाऊस सुरू झाला. आतापर्यंतच्या नोंदीनुसार सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यामध्ये झाला असून 5 जुलैला तो 156.2 मिलिमीटर तर 8 जुलैला या वर्षातला सर्वाधिक म्हणजे 161.7 मिलिमीटर कोसळला. मात्र, पुढे 18 जुलैपासून पावसाची गळती सुरू झाली. आणि तो 7 सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा कमीच होता. ऑगस्ट महिन्यातला यावर्षीचा पाऊस तर अलीकडील काळातला सर्वात कमी पाऊस आहे. 6 ऑगस्ट रोजी झालेला 40.5 मिमी आणि 9 ऑगस्ट रोजी झालेला 37.2 मिमी पाऊस वगळता संपूर्ण ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडला. त्यातही 29 आणि 30 जुलैला सर्वात अत्यल्प पावसाची नोंद झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

DA Hike Update: दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते वाढ; मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Ration Card Suspension: गोव्यात रविवारपासून 'या' रेशनकार्डांना बसणार तात्पुरती टाळेबंदी; ई-केवायसीनंतर पुन्हा सक्रिय

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

SCROLL FOR NEXT