Valpoi Water Contamination Dainik Gomantak
गोवा

Valpoi Water Issue: गटारावरील लादीवरही कीड आढळल्याने घबराट! वाळपईत चिंतेचे वातावरण, यापूर्वी पाण्यात आढळलेल्या कीडीशी साम्य

Valpoi Water Contamination: रविवारी सकाळी वाळपई येथील गटारावरील लादीवर साचलेल्या पाण्यातही कीड आढळून आली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाळपई: नळाच्या पाण्यात कीड आढळण्याचे प्रकार वाढत असतानाच आता गटारावरील लादीवर साचलेल्या पाण्यातही अशीच कीड आढळल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या महिन्यात सर्वप्रथम वाळपईतील प्रभाग ९ मध्ये नळाच्या पाण्यात कीड आढळली होती. त्यानंतर झर्मे आणि वाळपई प्रभाग ८ मध्येही अशाच प्रकारच्या किडी नळाच्या पाण्यात सापडल्या होत्या.

या घटना ताज्या असतानाच रविवारी सकाळी वाळपई येथील गटारावरील लादीवर साचलेल्या पाण्यातही कीड आढळून आली. त्यामुळे ही कीड नेमकी कुठून येते, कशी तयार होते आणि तिचा उगम काय आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी वाळपईतील पाणीपुरवठा खात्याने संबंधित भागांमध्ये घराघरांत जाऊन पाण्याच्या टाक्या व जलवाहिन्या स्वच्छ केल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळपई येथील गोवा बागायतदार सोसायटीसमोर असलेल्या एका दुकानाबाहेर उभ्या असलेल्या मालकाची नजर गटारावरील लादीवर साचलेल्या पाण्याकडे गेली असता त्यांना प्रथम पांढऱ्या रंगाचे नूडल्ससारखे काहीतरी दिसले. बारकाईने पाहिल्यानंतर ते नळाच्या पाण्यात पूर्वी आढळलेल्या किडीसारखेच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकार व इतर नागरिकांना याबाबत माहिती दिली.

आरोग्य विभागाने शोध घ्यावा

वाळपई शहरात अनेक ठिकाणी घरांमधील सांडपाणी थेट गटारात सोडले जाते. अनेक गटारे तुंबलेल्या अवस्थेत आहेत. या साचलेल्या पाण्यात ही कीड निर्माण होत असेल का, याचाही शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे. आरोग्य खात्याने पुढाकार घेऊन वाळपईतील सर्व गटारांची पाहणी करावी तसेच या किडीचा आरोग्यावर किती परिणाम होऊ शकतो याबाबत सविस्तर अहवाल सादर करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT