World Water Day Dainik Gomantak
गोवा

पिसुर्ले सरकारी विद्यालयात जागतिक जलदिन कार्यक्रम

जनजागृतीतून पटवून दिले पाण्याचे महत्त्व

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: पिसुर्ले सरकारी माध्यमिक विद्यालयाच्यावतीने जागतिक जलदिनाचे औचित्य साधून आजच्या जीवनात पाणी किती महत्त्वाचे आहे, यासंबंधी मार्गदर्शन तसेच जनजागृती फेरी काढून विद्यार्थी पाण्याचे महत्त्व पटवून दिले.

मुख्याध्यापक सुरज नाईक म्हणाले, पाण्याची गरज मोठी असली तरी वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे. आवश्यक व गरजेपुरताच पाण्याचा वापर व्हायला हवे.

संयोजक भैरू झोरे यांनी पाण्याविषयी माहिती देताना विविध उदाहरणे दिली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून पाण्याची बचत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, पाण्यासाठी भविष्यात गंभीर संकट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे आतापासूनच पाणी वाचवले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी जल दिनासंबंधी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्ती पत्रकाचे अनावरण केले. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी विद्यालय परिसरात ‘पाणी वाचवा’ अशा घोषणा देत जनजागृती फेरी काढण्यात आली. ज्येष्ठ शिक्षक नंदा माजिक यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना Good News कधी? 7 महिने उलटले तरी पगारवाढ नाही; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

SCROLL FOR NEXT