World Special Olympic  Dainik Gomantak
गोवा

स्पेशल ऑलिंपिक जागतिक स्पर्धेत गोव्याचे खेळाडू चमकले, जिंकली एकूण सहा पदके

स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोमंतकीय खेळाडूंनी आतापर्यंत तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन ब्राँझ अशी एकूण सहा पदके जिंकली आहे.

किशोर पेटकर

गोव्याच्या सिया सरोदे आणि तानिया उसगावकर यांनी जर्मनीतील बर्लिन येथे सुरू असलेल्या स्पेशल ऑलिंपिक जागतिक उन्हाळी क्रीडा स्पर्धेत राज्यासाठी बुधवारी अभिमानास्पद कामगिरी बजावली. स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोमंतकीय खेळाडूंनी आतापर्यंत तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन ब्राँझ अशी एकूण सहा पदके जिंकली आहे.

भाटी-सांगे येथील सिया हिने पॉवरलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्णांसह एकूण चार पदके पटकावली. तिने डेड लिफ्ट आणि स्क्वॅट प्रकारात सुवर्ण, तर कंबाईंड प्रकारात रौप्य आणि बेंच प्रेस प्रकारात ब्राँझपद मिळविले. राज्याचे समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सियाचे कौतुक करताना ही कामगिरी गोमंतकीय आणि भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले. गोव्याची ॲथलिट गीतांजली नागवेकर हिने मंगळवारी सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेत गोव्याचे 13 ‘स्पेशल’ क्रीडापटू सहभागी झाले आहे

तानियाची स्वप्नपूर्ती

डिचोली येथील केशव सेवा साधना केंद्राची विद्यार्थिनी असलली १५ वर्षीय तानिया उल्हास उसगावकर सुर्ल-पाळी येथील देऊळवाडा येथे राहते. तिने रोलर स्केटिंगमधील ३० मीटर स्ट्रेट लाईन प्रकारात तिसरा क्रमांक मिळविला. ‘‘तानियाचे पदक हे आम्हा सर्वांची स्वप्नपूर्ती आहे. आमच्या मुलीने दोन पदके जिंकण्याचे आश्वासन दिले होते. त्या दिशेने तिचे एक पाऊल यशस्वी ठरले. स्पर्धेतील आणखी एका प्रकारात ती सुवर्णपदक जिंकण्याचा आम्हाला विश्वास आहे,’’ अशी प्रतिक्रिया तानियाची आई अनिता उसगावकर यांनी दिली. तानिया ३० मीटर स्लॅलॉम प्रकारात भाग घेणार आहे.

गोव्याचे पदक विजेते खेळाडू

- गीतांजली नागवेकर ः ॲथलेटिक्स - सुवर्णपदक, लेव्हल डी ८०० मीटर

- सिया सरोदे ः पॉवरलिफ्टिंग - सुवर्णपदक (२) डेड लिफ्ट व स्क्वॅट, रौप्य कंबाईंड, ब्राँझ बेंच प्रेस

- तानिया उसगावकर ः रोलर स्केटिंग - ब्राँझपदक, ३० मीटर स्ट्रेट लाईन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT