Brahmeshanandacharya Dainik Gomantak
गोवा

आध्यात्मिक सामर्थ्याने जागतिक शांतता प्रस्थापित करावी : ब्रह्मेशानंदाचार्य

रियाध-सौदीमध्ये जागतिक शांतता परिषद

दैनिक गोमन्तक

खांडोळा : आपण सर्वजण ईश्वराला समर्पित आहोत. नावे वेगवेगळी असू शकतात. पण देव एक आहे. आपल्यातील ही एकता सर्वोच्च आहे. ही एकता आपल्या कथन आणि कृतीतून दाखविली पाहिजे. आध्यात्मिक सामर्थ्यांने जागतिक शांतता प्रस्थापित करावी, असे संबोधन आध्यात्मिक धर्मगुरु पद्मश्री धर्मभूषण सद्‌गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींनी केले.

मुस्लिम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस आणि मुस्लिम विद्वानांच्या संघटनेचे अध्यक्ष शेख डॉ. मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा यांनी 11 मे रोजी मुस्लिम वर्ल्ड लीगद्वारा आयोजित रियाध-सौदी येथील विशेष कार्यक्रमात ‘धर्माच्या अनुयायांमध्ये समान मूल्यांचा प्रचार’ या विषयावरील जागतिक संसदेसाठी पद्मश्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींना भारतीय हिंदू समुदायाचे प्रमुख म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

स्वामी पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शांततेसाठी मूल्य शिक्षण, मानवी हक्क, लोकशाही आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्याची दृष्टी आहे. आध्यात्मिक सामर्थ्याने जागतिक शांतता प्रस्थापित होईल.

हिंदू समूदायातर्फे पद्मश्री ब्रह्मेशानंदाचार्य व ब्राह्मीदेवी यांच्या हस्ते डॉ. अब्दुल करीम अल इसा यांना ‘जागतिक शांतता तथा समरसता पुरस्कार’ प्रदान करुन सन्मानित केले.

श्री राम प्रसाद - सौदी अरेबिया येथील भारतीय दूतावासातील प्रमुख कार्यवाह यांनी देखील पूज्य स्वामींची विशेष भेट घेऊन आशीर्वाद घेतला. सद्‍गुरू फाउंडेशनच्या अध्यक्ष अ‍ॅड्. ब्राह्मीदेवी, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध वक्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके, 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

India Population: लोकसंख्या का वाढवता?

Sanjivani Sugar Factory: संजीवनी साखर कारखान्याचे कर्मचारी वेतनाविना; वित्त खात्यात फाईल प्रलंबित, 2 महिन्यांचे वेतन अडल्याने कोंडी

SCROLL FOR NEXT