आर्क ऑफ व्हाईस रॉय आणि जागतिक वारसास्थळ असलेले कॅजेटन चर्च Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: राज्यातील जागतिक वारसास्थळावर होतेय अतिक्रमण

माफिया राज्य विकायला निघाले असताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आरोप सामाजिक कार्यकर्ते ग्लीन काब्राल यांनी केला.

दैनिक गोमन्तक

पणजी: जुने गोवा (Goa) येथील आर्क ऑफ व्हाईस रॉय आणि जागतिक वारसास्थळ असलेले कॅजेटन चर्च (cajeten church) परिसरातील जागेवर अज्ञातांनी अतिक्रमण करून इमारत उभारण्यास सुरुवात केली असल्याची माहिती सेव्ह ओल्ड गोवा ॲक्शन कमिटीसह विविध संघटनांनी दिली. संबंधितांवर तात्काळ कारवाई करून जागतिक वारसास्थळ वाचविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

येथील पेरदाद संस्थेच्या कार्यालयात शनिवारी (ता. 10) घेण्‍यात आलेल्‍या पत्रकार परिषदेत ‘सेव्ह ओल्ड गोवा’ समितीचे फ्रेडी डायस म्हणाले, सदर ठिकाणी गेल्या 20 वर्षांपासून झोपडीवजा घर होते. मात्र महामारीचा फायदा उठवून ती झोपडी पाडून नवी इमारत उभारली जात आहे. हे क्षेत्र जागतिक वारसास्थळ म्हणून परिचित आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. तरीही काही माफिया तेथे अतिक्रमण करत असतानाही त्याकडे शासनाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.

गोवा हेरिटेज ॲक्शन ग्रुपच्या हेता पंडित म्हणाल्या की, सदर ठिकाणी घरे दुरूस्‍तीलाही परवानगी नाही. तरीही बांधकामाना कशी काय परवानगी दिली जाते? त्या बांधकामाला परवानगी दिली नसल्याचे सांगितले जाते, मग कारवाई का केली जात नाही? हा आमच्यासमोरील प्रश्‍न आहे. गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्याची गरज असल्याने या अतिक्रमणाविरोधातील लढा कायम राहिल.

माफिया राज्य विकायला निघाले असतानाही सरकार केवळ बघ्याची भूमिका घेते. त्यामुळे सरकारवरच संशय बळावतो, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते ग्लीन काब्राल यांनी केला. सध्या चर्चवर घाला घातला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT