Coconut  Canva
गोवा

World Coconut Day: गोमंतकीयांचे परंपरागत पीक 'नारळ! सुमारे १२ कोटी नारळांचे होते उत्पादन; लागवड क्षेत्रफळात ९९ हेक्टरने वाढ

World Coconut Day 2024: गोव्यातील नागरिक इतर पिकापेक्षा माड लागवडीवर अधिक भर देतात, कारण नारळ हमखास मिळतील याची खात्री असते

गोमन्तक डिजिटल टीम

World Coconut Day Special Story

पणजी: नारळ हे गोमंतकीयांचे परंपरागत पीक होय. गोव्यातील प्रमुख पिकांपैकी ते एक महत्त्वाचे पीक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा माड लागवड क्षेत्रफळात ९९ हेक्टरने वाढ झाल्याने कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले.

दरम्यान फळदेसाई म्हणाले की, राज्यातील २६७८२ हेक्टर क्षेत्रफळ माड लागवडीखाली असून सुमारे १२ कोटी नारळांचे उत्पादन होते. राज्य सरकारकडून माड लागवडीसाठी विविध योजना राबविल्या जातात. नारळाला हमीभाव देखील दिला जातो, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी करून घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

गोव्यातील नागरिक इतर पिकापेक्षा माड लागवडीवर अधिक भर देतात, कारण नारळ हमखास मिळतील याची खात्री असते. तसेच माडाच्या लागवडीत अंतर्गत पीक जसे की केळी, अननस, जायफळ, मिरी तसेच सुपारीची लागवडही करता येते. तसेच माड लागवडीची गोव्यात परंपरा असून त्याला सांस्कृतिक महत्त्व असल्याने गोवेकरांचा नारळावर अधिक विश्‍वास असल्याचे माजी कृषी संचालक नेव्हील आल्फोन्सो यांनी सांगितले.

गोव्यात बाणावली, नानोडा, कळंगुट अशा विविध जातीच्या माडांची लागवड करण्यात येते. बाणावली जातीच्या माडाला नारळ मध्यम आकाराचे येतात, परंतु मोठ्या प्रमाणात नारळ मिळतात. कळंगुट जातीच्या माडाला आकाराने मोठे नारळ लागतात. त्यामुळे आपली गरज कोणती आहे ते पाहून लागवड करावी. शेतकऱ्यांनी शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे. माडाला पाणी, खत दिल्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्नात वाढ होईल. त्यासोबत ज्यावेळी नारळाला योग्य भाव मिळत नाही असे वाटते त्यावेळी नारळावर प्रकिया करून त्यापासून उत्पादन करून विक्री केली जाऊ शकते. माड आणि नारळाचा एकही भाग वाया जात नाही त्याचा वापर करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आल्फोन्सो यांनी सांगितले.

राज्यातील लागवड क्षेत्र

यंदाचे राज्यातील माड लागवडीखालील क्षेत्रफळ - २६७८२ हेक्टर

गेल्या वर्षीचे लागवडीखालील क्षेत्रफळ -२६६८३ हेक्टर

क्षेत्रफळात झालेली वाढ - ९९ हेक्टर

उत्तर गोव्यातील माड लागवडीखालील क्षेत्रफळ - ९७२३ हेक्टर

दक्षिण गोव्यातील माड लागवडीखालील क्षेत्रफळ - १७०५९ हेक्टर

नारळाच्या वस्तू खरेदी करा

नारळ उत्पादन ही गोव्याची कृषी परंपरा आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी केवळ सरकारच्या सहाय्यावरच नव्हे तर सर्वसामान्य गोमंतकीयांनी, उद्योगांनी मोठ्या प्रमाणात नारळाच्या वस्तु खरेदी केल्या पाहिजे. सजावटीसाठी प्लास्टिकचा वापर करण्याऐवजी नारळाच्या चुडतांचा वापर करावा, जेणेकरून हस्तकला कामगारांना अर्थांजन होईल. नारळ व नारळाचे उत्पादन वाढीची जबाबदारी आमची देखील असल्याचे आल्फोन्सो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT