Casino Dainik Gomantak
गोवा

कॅसिनो गोव्यात कामगार बाहेरचे; गोमंतकीयांच्या तुलनेत परराज्यातील कामगारांची संख्या दुप्पट

राज्यात जमिनीवर 11 आणि मांडवी नदीत 06 असे एकूण 17 कॅसिनो कार्यरत आहेत.

Pramod Yadav

गोवा म्हटले की येथील कॅसिनोंची प्रामुख्याने चर्चा होत असते, राज्यात जमिनीवर आणि पाण्यावर तरंगणारे असे दोन प्रकारचे कॅसिनो आहेत. पण या कॅसिनोत काम करणारे कामगार गोमंतकीयांच्या तुलनेत परराज्यातील अधिक आहेत.

कामगार मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी पावसाळी अधिवेशानात दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जमिनीवर 11 आणि मांडवी नदीत 06 असे एकूण 17 कॅसिनो कार्यरत आहेत. या सर्व कॅसिनोमध्ये मिळून 8,815 कामगार कार्यरत आहेत.

कामगार मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी पावसाळी अधिवेशानात दिलेल्या माहितीनुसार, जमिनीवरील 11 कॅसिनोमध्ये 978 स्थानिक आणि 1,652 परराज्यातील असे 2,630 कामगार कार्यरत आहेत.

तर, मांडवीत असलेल्या सहा कॅसिनो मध्ये 2,024 स्थानिक आणि 4,161 परराज्यातील असे एकूण 6,185 कामगार काम करत आहेत.

एकत्रित पाहिले असता एकूण 17 कॅसिनोमध्ये 3002 गोमंतकीय कामगार आणि 5,813 परराज्यातील कामगार कार्यरत आहेत. अशी माहिती मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी माहिती दिली आहे.

राज्यातील कॅसिनो पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. गोव्यात येणारे पर्यटक कॅसिनोला भेट देत असतात. त्यातून राज्याला कोट्यवधी रूपयांचा महसूल मिळत असतो.

कॅसिनोत काम करणाऱ्या गोमंतकीय आणि परराज्यातील कामगारांच्या आकडेवारीबाबत विरोधक वारंवार प्रश्न उपस्थित करत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT