Worker Card Scheme Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : गोव्यात परप्रांतीय कामगारांना मिळणार 'ओळख', अशी आहे योजना

दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी दिली माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : गेल्या पाच वर्षांत राज्यातील गुन्हेगारी वाढत आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये खून, बलात्कार व रस्ता अपघातांत वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनांमध्ये गोव्याव्यतिरिक्त परप्रांतीयांकडून केलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी हि जास्त आहे.

राज्यात गुन्हेंगारीची दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी विविध भागात वास्तव्य करून असलेल्या परप्रांतीय कामगारांची कसून तपासणी सुरु केली होती.

दरम्यान परप्रांतीय कामगारांची माहिती प्राप्त व्हावी यासाठी सरकार लवकरच एक योजना सुरु करणार आहे. याबाबतची माहिती दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी दिली.

"सरकार परप्रांतीयांसाठी लवकरच कामगार कार्ड योजना सुरु करणार आहे. याद्वारे राज्यात कामाला येणाऱ्या कामगारांना हे कार्ड देण्यात येणार आहे. जेणेकरुन त्यांच्याविषयी सर्व तपशीलवार माहिती ठेवण्यास प्रशासनाला मदत होणार आहे."

"कार्डच्या मदतीने कामगारांची माहिती उपलब्ध होण्याबरोबरच त्यांच्या कल्याणाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचू शकतील" अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT