Melissa Dias Dainik Gomantak
गोवा

International Nurses Day 2023 :डॉक्‍टर औषधे लिहून देणार; पुढची जबाबदारी नर्सचीच!

14 वर्षापासून परिचारिका म्हणून विविध इस्पितळांत बजावली सेवा

दैनिक गोमन्तक डिजिटल

सपना सामंत

रुग्णांना मरणाच्या दारातून बाहेर काढण्याचे काम डॉक्टरांपेक्षा परिचारिकांचेच जास्‍त असते. त्यांची तळमळ, रुग्णांप्रती काळजी, प्रेम, आपुलकी यामुळे रुग्ण त्‍वरित बरा होतो. असेच आपले कार्य सेवाभावी वृत्तीने पार पाडणारी ज्‍येष्‍ठ परिचारिका म्‍हणजे मेलिसा डायस. ‘वृंदावन’ हॉस्पिटलच्‍या निर्स विभागाची ती प्राध्यापिका. गेल्या 14 वर्षापासून परिचारिका म्हणून विविध इस्पितळांत तिने सेवा बजावली आहे.

परिचारिका दिनानिमित्त बोलताना मेलिसा डायस म्‍हणाल्‍या की, आजच्या बदलत्या जीवन शैली व तंत्रज्ञानानामुळे आरोग्य क्षेत्रात अनेक बदल घडत आहेत. डॉक्टर औषधे लिहून निघून जाणार. मात्र त्यापुढे रुग्णांची काळजी घेते ती परिचारिका.

रुग्‍णांना औषधे, जेवण देण्‍याबरोबरच त्‍यांची प्रेमाने, आपुलकीने विचारपूस करते. त्‍यामुळे रुग्‍णही लवकर बरा होतो. ज्यावेळी मरणाच्या दारातून बरा होऊन एखादा रुग्‍ण हसत हसत घरी जातो, त्‍यावेळी आपण केलेल्‍या सेवेचे सार्थक झाले असे वाटते. मनोमनी खूप बरे वाटते.

"दिवसाची ड्युटी किंवा रात्रपाळी, ड्युटी ही ड्युटी असते. पैशापेक्षा माणुसकी महत्वाची असते. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी पैशांसाठी नोकरी करू नये किंवा पुढील पिढीने देशसेवा करण्याच्या हेतूने हे क्षेत्र निवडले पाहिजे. पारिचारिकेच्या क्षेत्रात काम करत असताना नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत."

मेलिसा डायस, ज्‍येष्‍ठ परिचारिका

"सर्व परिचारिकांना आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या शुभेच्छा. तुमची करुणा, कौशल्य आणि वचनबद्धता रूग्णांच्या जीवनात बदल घडवून आणते. आशा, सांत्वन आणि उपचारांचा मार्गदर्शक प्रकाश असल्याबद्दल धन्यवाद. आज आम्ही आरोग्य सेवेसाठी तुमचे अमूल्य योगदान साजरे करून तुमचा सन्मान करतोय."

डॉ. दिव्या राणे, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Horoscope 7 October 2026: गुंतवणुकीसाठी शुभ दिवस, बँक बॅलेन्समध्ये होणार तगडी वाढ! बुधवार ठरणार 'या' राशींसाठी गोल्डन डे

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

SCROLL FOR NEXT