Road  Dainik Gomantak
गोवा

बेतोडा-बायथाखोल बोरी रस्त्याचे काम कूर्मगतीने

पावसाळा तोंडावर : मॉन्सूनपूर्व पावसात गटाराचा भाग गेला वाहून

गोमन्तक डिजिटल टीम

मॉन्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बेतोडा ते बायथाखोल-बोरी या बगल रस्त्याचे काम अतिशय कूर्मगतीने सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते विराज सप्रे यांनी केली आहे.

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, बायथाखोल- बोरी ते बेतोडा बायपास रस्त्याचे सुरू असलेले रुंदीकरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी आहे.

गेल्या बुधवारी झालेल्या जोरदार मॉन्सूनपूर्व पावसावेळी नव्याने टाकलेल्या डांबराचा आणि गटाराचा काही भाग वाहून गेला आहे.

बगल रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे आणि ते अतिशय संथ गतीने सुरू असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.

गेल्या बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्याची दैन्यावस्था झाली आहे. आता येणाऱ्या पावसाळ्यात त्याची काय स्थिती होईल, असा प्रश्‍न स्थानिकांना पडला आहे.

बेतोडावासी संकटात

या संथ गतीच्या कामाचा परिणाम वाहनधारकांना आणि विशेषत: बोणबाग आणि बेतोडा येथील लोकांवर होणार आहे. या बांधकामादरम्यान कल्व्हर्ट अडवण्यात आले होते आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या तलावांमध्ये पाणी साचले होते.

या रस्त्याचे काम घेतलेल्या कंत्राटदाराला वाहनचालकांची अजिबात काळजी नाही का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

निर्माणाधीन रस्त्यावर वारंवार अपघात

ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी कंत्राटदाराचा सुपरवायझर असणे अत्यंत गरजेचे आहे. या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघाताला कंत्राटदार जबाबदार आहे.

काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरील कचऱ्यावरून एक दुचाकी घसरून दोघेजण जखमी झाले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी विराज सप्रे यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT