Work in progress at Chander despite court order. Dainik Gomantak
गोवा

‘कुळे ते कॅसलरॉक’चे काम सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही सुरूच

दुपदरीकरण थांबवा: चांदर येथील नागरिकांत नाराजी

दैनिक गोमन्तक

मडगाव: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही रेल्वे विकास निगमने चांदर येथे आपले काम सुरूच ठेवले आहे. चांदर रेल्वे स्टेशनवर फुटब्रीज बांधण्याचे काम सुरू ठेवल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त करत हा न्यायालयीन आदेशाचा केलेला अवमान आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

पश्चिम घाट क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील भाग असलेल्या कुळे ते कॅसलरॉकपर्यंतच्या रेल्वे मार्ग दुपदरीकरणाच्या कामाला केंद्रीय वन्यजीव मंडळाने दिलेली परवानगी नाकारत सर्वोच्च न्यायालयाने या कामावर चाप आणला असला तरी या आदेशामुळे इतर ठिकाणच्या विस्तारीकरणावर त्याचा परिणाम होऊन ते काम बंद पाडले जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यासंदर्भात रेल्वे विकास निगमच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही; मात्र दक्षिण पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिस हेगडे यांना विचारले असता, सर्वोच्च न्यायालयाने जे निर्बंध घातले आहेत ते फक्त कुळे ते केसल रॉक पट्ट्यासाठीच लागू आहेत. इतर भागातील कामाला हे निर्बंध लागत नाहीत, असा खुलासा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा रेल्वे प्रशासन अभ्यास करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

...तर पुन्हा आंदोलन

रेल्वेच्या या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ‘गोंयात कोळसो नाका’ या संघटनेचे सहनिमंत्रक अभिजित प्रभुदेसाई यांनी हा मुद्दा खोडून काढताना हा आदेश फक्त कुळे कॅसलरॉक पट्ट्यालाच लागू नसून, सर्व कामांना लागू होतो असे सांगत हे कामच नव्हे तर जमीन संपादन प्रक्रियाही बंद करण्याची गरज व्यक्त केली. रेल्वेने हे काम बंद केले नाही, तर आम्ही परत आंदोलन करू. आमच्या आंदोलनाची दिशा आम्ही लवकरच ठरवू, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: गणपती कोणाला पावणार?

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

SCROLL FOR NEXT