Campal Ground Construction Dainik Gomantak
गोवा

Campal Ground Construction: कांपाल फुटबॉल मैदानाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार? अधिकारी म्हणतात...

गोवा मुक्ती दिनाच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय कार्यक्रम या मैदानावर आयोजित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट

Kavya Powar

Campal Ground Construction: पणजीतील कांपाल मैदानावर फुटबॉल स्टेडियम-कम-परेड ग्राउंडचे काम सध्या सुरू आहे. मार्च 2022 मध्ये मैदानाचे काम सुरू झाले. यावर्षी सप्टेंबरमध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अजूनही ते काम पूर्ण झालेले नाही. या वर्षाअखेरीस ते पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे.

माहितीनुसार, येत्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल. कारण 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिनाच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय कार्यक्रम या मैदानावर आयोजित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

मार्च 2022 मध्ये या कामाची सुरुवात झाली होती. या वर्षी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणांमुळे या कामाला विलंब झाला. मैदानावर फुटबॉलची खेळपट्टी तयार आहे आणि सध्या स्टँडचे काम सुरू असल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा किमान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्प तयार होईल असे सांगण्यात येत आहे. प्रकल्पाची अंदाजे किंमत 30 कोटी रुपये आहे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राज्य सरकार आणि इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड यांच्यात गोवा राज्य नागरी विकास एजन्सीने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराद्वारे हा प्रकल्प राबविला जात आहे.

संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 41,130 चौ.मी.मध्ये बांधलेल्या फुटबॉल स्टेडियम-कम-परेड ग्राउंडमध्ये 1,000 लोकांची क्षमता असेल. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची जागा असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT