Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

न्यायप्रविष्ट मोपा लिंक रोडचे काम पोलिस संरक्षणात सुरु

शेतकरी हतबल, काजूची आणि इतर झाडे जेसीबीने हटवली

दैनिक गोमन्तक

पेडणे : मोपा विमानतळाच्या लिंक रोडचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शुक्रवारी सकाळी पोलिस संरक्षणात बुलडोझर घालून या लिंक रोडचे काम सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा विरोध झुगारुन लिंक रोडचं काम सुरु केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. (Mopa Airport News Updates)

पोलीस संरक्षणात बुलडोझर आणून शेतकऱ्यांची हरकत असलेल्या या लिंक रोडच्या कामासाठी पोलिस संरक्षणात काजूची व इतर झाडे हटवून जमीन सपाटीकरण करण्यास सुरुवात केली.या घटनेची माहिती मिळाल्यावर शेतकरी एकत्रित होऊन घटनास्थळी जमले व पोलीसांच्या नजरेस ही बाब आणून देण्यासाठी चर्चा करत असताना तिथे भूसंपादन अधिकारी चंद्रकांत शेटकर आले आणि त्यांनी कामात अडथळा आणणाऱ्यांना अटक (Arrest) करण्याचा आदेश पोलिसांना दिला.

भू संपादन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी (Police) तिथे आलेल्या शेतकऱ्यांना तिथून निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे हतबल झालेले शेतकरी तिथून गेले. यानंतर जेसीबी यंत्राद्वारे अनेक काजू व अन्य झाडे पाडून रस्त्याचे सपाटीकरण केले. शेतकऱ्यांनी व नुकत्याच स्थापन झालेल्या मोपा विमानतळ (Mopa Airport) पंचक्रोशी पीडित जन संघटनेचे अध्यक्ष भारत बागकर यांनी सरकारच्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.लोकशाहीची ही थट्टा असून हे सरकार हुकुमशाहीचे आहे. लवकरच त्यांना त्याचे उत्तर मिळणार असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT