Yuri Alemao on Women Reservation Bill Dainik Gomantak
गोवा

Women Reservation Bill: गोव्यात महिला आरक्षण लागू होण्यासाठी 2032 ची वाट पाहावी लागेल - युरी आलेमाव

विधेयक लवकरात लवकर लागू होईल अशी आशा आहे - अलेमाव

Pramod Yadav

Women Reservation Bill: गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लोकसभेत मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल असल्याचे म्हटले आहे.

पण, गोव्यातील महिलांना आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी 2032 ची वाट पाहावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. जनगणनेला उशीर झाला आहे, जनगणनेनंतरच मतदारसंघांचे नवीन सीमांकन होऊ शकते. त्यामुळे आरक्षण लागू होण्यास विलंब होईल असे त्यांनी म्हटले आहे.

'जनगणनेच्या पहिल्या अहवालानंतर नवीन सीमांकन सुरू होईल. याचा अर्थ महिला आरक्षण विधेयक 2032 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत प्रभावी होऊ शकते. जर ही प्रक्रिया लवकर पूर्ण झाली तर 2029 च्या लोकसभा निवडणुकीत आरक्षण मिळू शकते किंवा 2034 च्या निवडणुकांची वाट पहावी लागेल,' असे युरी म्हणाले.

काँग्रेसने नेहमीच महिला सक्षमीकरणला प्राधान्य दिले आहे, म्हणूनच हे विधेयक लवकरात लवकर लागू होईल अशी पक्षाला आशा आहे. असेही अलेमाव म्हणाले.

कृतीच्या मागील हेतू कृती चांगली किंवा वाईट हे ठरवत असते. भाजप सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयक लाखो भारतीय महिला, मुली आणि इतर मागासवर्गीयांच्या आशांचा विश्वासघात आहे. असा आरोप आलेमाव यांनी केलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT