National Games Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

National Games Goa 2023: हॉकीत झारखंडकडून यजमान गोव्याचा पराभव

झारखंडच्या महिला संघाने यजमान गोव्याचा 4-0 असा पराभव केला.

Pramod Yadav

National Games Goa 2023: गोव्यात आयोजित 37व्या राष्ट्रीय खेळ 2023 मधील हॉकी स्पर्धा सोमवारपासून सुरू झाली. 7 नोव्हेंबरपर्यंत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत आज हॉकी झारखंडच्या महिला संघाने यजमान गोव्याचा 4-0 असा पराभव केला. पेडे, क्रीडा संकुलातील हॉकी मैदानावर हा सामना रंगला.

झारखंड संघासाठी अलबेला राणी टोप्पो, अलका डुंगडुंग, निशा मिंज आणि दीप्ती टोप्पो यांनी प्रत्येकी एक गोल केला. झारखंड संघाच्या पहिल्या विजयाबद्दल हॉकी झारखंड, क्रीडा विभाग आणि झारखंड ऑलिम्पिक संघटनेच्या सर्व अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

झारखंडचा संघ स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करून विजेता ठरेल, अशी आशा संघाचे प्रशिक्षक आणि खेळाडुंनी व्यक्त केली आहे.

पदक टेबल

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आत्तापर्यंत सुवर्ण ४५, रौप्य ३१ आणि कास्य ३२ अशी एकूण १०८ पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. त्या खालोखाल हरियाणा सुवर्ण १८, रौप्य १२ आणि कास्य १५ अशी एकूण ४५ पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे.

तर, गोव्याने सुवर्ण २, रौप्य ५ आणि कास्य २१ अशी एकूण २८ पदकांची कमाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT