Women Trafficking Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : गोव्यात महिला तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये घट

पोलिसांचे दुर्लक्ष; साडेपाच वर्षात राज्यात 171 प्रकरणे नोंद

दैनिक गोमन्तक

Goa Crime : पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळे परराज्यातील तरुणींची तस्करी गोव्यात करण्याच्या प्रकारात वाढ झाली असली, तरी गेल्या अडीच वर्षांपासून महिला मानवी तस्करीच्या गुन्ह्यांच्या नोंदीत घट झाली आहे. राज्याच्या किनारपट्टी भागात रात्रीच्यावेळी झगमगाटात महिला देहविक्री व्यवहार चालतो. मात्र, 2020 सालानंतर फक्त 40 प्रकरणांची नोंद विविध पोलिस स्थानकांत झाली आहे. यावर्षी गेल्या चार महिन्यांत पोलिसांनी महिला तस्करीतून सुटका केलेली एकही नोंद नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

दलाल या तरुणींना एका फ्लॅटमध्ये किंवा खोलीत ठेवतात व ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना पोहचवले जाते. हा व्यवहार दलाल पोलिसांच्या अटकेच्या भीतीने गोव्याबाहेर राहून करतात. गोव्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांचा वापर या तरुणींना ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी केला जातो. या दलालांनी आणखी एक क्लुप्ती आखली आहे. ग्राहकाला सरळ त्या तरुणीशीच संपर्क साधण्यास दिले जाते व तरुणी जागेची माहिती देईल तेथे त्या ग्राहकाला बोलावले जाते. ती दोघे संमतीने गेल्यास पोलिसही कारवाई करू शकत नाहीत. त्यामुळे आता वेश्‍या प्रकरणांच्या कारवाईत अडथळे येत आहेत अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

या महिलांची तस्करी करून त्यांना मसाज पार्लरमध्ये ठेवून त्यांना देहविक्री करण्यास दलाल भाग पाडतात. राज्यातील मसाज पार्लरची तपासणी झाली, तेव्हा अनेक मसाज पार्लर चालकांनी ती बंद केली. तस्करी करण्यात येत असलेल्या तरुणी या 18 ते 25 वयोगटातील असतात. कौटुंबिक स्थिती हलाखीची असल्याने रोजगार मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असतानाच त्या दलालांच्या जाळ्यात अडकतात. त्यांना पैशांचे आमिष दाखवून व फूस लावून देहविक्रीसाठी भाग पाडले जाते. त्यांच्यासमोर दुसरा पर्यायही नसतो. पोलिसांनी याविरोधात कठोर पावले उचलली नाहीत, तर समाजात चुकीचा संदेश जाईल त्याचबरोबर देहविक्रीसाठी परराज्यातून येणाऱ्या तरुणींची संख्याही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने दिली.

2017 ते जून 2022 दरम्यान राज्यात महिला मानवी तस्करीचे एकूण 171 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये उत्तर गोव्यात 70, दक्षिण गोव्यात 43, गुन्हे शाखेने 58 यांचा समावेश आहे. देशातील विविध राज्यातील गरीब व असहाय्य तरुणींना लक्ष्य बनवून त्यांची देहविक्रीसाठी तस्करी केली जाते.

यावर्षीच्या एप्रिल महिन्यापासून राज्यातील महिला तस्करीचे एकही प्रकरण पोलिसांमध्ये नोंद झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई बंद केली काय असा संशय व्यक्त केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी कळंगुट व हणजूण पोलिसांनी या महिला मानवी तस्करीविरोधात अनेक गुन्हे दाखल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT