Dainik Gomantak
गोवा

Goa News: महिलांनी स्वतःच्या हक्काप्रति जागृत असणे आवश्‍यक

Goa News: दीपाली नाईक : आंबावली येथे महिला जागृती शिबिर, 150 महिलांचा सहभाग

दैनिक गोमन्तक

Goa News: सर्व महिलांनी स्वावलंबी, सतर्क आणि आपल्या हक्कासाठी जागरूक व प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालिका दीपाली नाईक यांनी सांगितले. गोवा राज्य महिला आयोग व आंबावली पंचायतीतर्फे आयोजित महिला जागृती शिबिरात त्‍या प्रमुख पाहुण्‍या म्‍हणून बोलत होत्‍या.

यावेळी गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रंजिता पै, सदस्य केतकी गडेकर, ॲड. फियोना फुर्तादो, आंबावली सरपंच देविदास देयकर, उपसरपंच सेबिस्तीना रिबेलो, पंच एवेत्ता रानिया जॉनी कार्दोज, फातर्पा सरपंच शीतल नाईक व आंबावली पंचायत सचिव वंदना देसाई उपस्थित होते.

आंबावली पंचायत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरवात करण्यात आली. यावेळी १५० आसपास महिला उपस्थित होत्या.

रंजिता पै म्हणाल्या की, महिलांनी अत्याचार विरोधात सहनशक्ती संपेपर्यंत वाट बघू नये, केतकी गडेकर यांनी मासिक पाळीबाबत तर अॅड. फियोना फुर्तादो यांनी महिला सक्षमीकरण कायद्याची माहिती दिली. सूत्रसंचालन वंदना देसाई यांनी केले.

पालकांनी मुलांसमोर भांडू नये

दीपाली नाईक पुढे म्हणाल्या की, आपल्या मुलांना चांगले नागरिक घडविण्याचे महत्वाकांक्षा अंगी बाळगता तर पालकांनी आपल्या मुलांसमोर कधी भांडू नये. त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो व मुले वाईट सवयींकडे वळतात. एकदा वाईट सवयी लागली तर त्यांना त्यातून बाहेर काढणे खूप असते असे आपल्या भाषणात म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT